राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Photo Credits-Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) माढा (Madha) येथून निवडणुक लढवणार आहेत की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच माढ्यातून निवडणुक लढवण्याबाबत फेरविचार सुरु असल्याचे सांगितले जात होते. मात्र शरद पवार यांच्या समोर माढ्यासोबत अन्य पर्याय असून सोलापूर (Solapur) किंवा पुण्यातील (Pune) जिल्ह्यातील काही मतदारसंघातील काही समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

2009 रोजी माढ्यात पहिली लोकसभा निवडणुक झाली होती. त्यावेळी शरद पवार यांना 3 लाख 14 हजार मतांच्या फरकाने जिंकून आले होते. तत्पूर्वी, 'आता लोकसभेची निवडणुक लढवणार नाही आणि राज्यसभेतून संसदेतच जाणार' असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. तसेच काही कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी शरद पवार यांनी माढ्यातून निवडणुक लढवावी अशी मागणी केली होती. मात्र गेल्या दोन दिवसात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून निवडणुक लढवणार का याबद्दल फेरविचार सुरु असल्याचे सांगितले जात होते. तर शरद पवार यांना माढा येथून निवडणुक लढवणार का याबद्दल विचारले असता त्यांनी गेली 14 वर्षे मी राजकीय निवडणुक लढवत आलो आहे. मात्र आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आल्याने माढा येथून निवडणुक लढवणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.(हेही वाचा-महाराष्ट्र: खासदार संजय काकडे लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार, भाजप पक्षाला राज्यात पहिला धक्का)

शरद पवार यांच्या माढ्यातील निवडणुकीमागे राज्यसभेच्या जागांचे गणित असल्याचा ही तर्क लावला जात होता. तसेच लोकसभेत शरद पवार यांना विजय मिळाल्यास त्यांना राज्यसभेतील पदाचा त्याग करावा लागणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुण्यात बैठक घेऊन या विषयावर चर्चा झाली. तत्पूर्वी शरद पवार यांनी घरातील मंडळींशी याबद्दल चर्चा केली आहे. त्यामुळे पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे निवडणुक लढवतील असे या बैठकीत सांगण्यात आले आहे. त्याचसोबत नव्या पिढीली संधी मिळावी असे मला वाटत असल्याचे शरद पवार यांंनी म्हटले आहे.