महाराष्ट्र: खासदार संजय काकडे लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार, भाजप पक्षाला राज्यात पहिला धक्का
संजय काकडे, सहयोगी खासदार, भाजप (Photo courtesy: Twitter)

मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या संपर्कामध्ये असणारे पुण्याचे भाजप सहयोगी  खासदार (BJP MP) संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी आज अखेर आपण लवकरच  काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहोत अशी माहिती मीडियाला दिली आहे. मागील दोन दिवसांपासून संजय काकडे (Sanjay Kakade)  दिल्लीमध्ये आहेत. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी भेट घेऊन आपण भविष्यात पक्षासोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याची इच्छा बोलून दाखवली आहे. लवकरच संजय काकडे यांचा काँग्रेस (Congress)  पक्षामध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे.

संजय काकडे हे पुण्यातून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. गिरीश बापट विरुद्ध संजय काकडे असा संघर्ष असल्याने तो आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही दिसून येणार आहे. त्यामुळे भाजपामध्ये नाराज असलेले संजय काकडे आता कांग्रेसच्या वाटेवर चालताना दिसणार आहेत. राहुल गांधी जी जबाबदारी सोपवतील ती मी स्वीकारायला तयार आहे अशी प्रतिक्रिया संजय काकडे यांनी बोलून दाखवली आहे. Assembly Elections Results 2018: राम मंदिर सोडा, विकासाच्या मूळ मुद्द्याकडे परत फिरा: खा. संजय काकडे

आज संध्याकाळी मुख्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या साऱ्याचे लक्ष निवडणुकांच्या तारखा आणि आचार संहिता यांच्याकडे लागले आहे.