शरद पवार, अध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेसचे (| (Photo Credits- Facebook )

आगामी लोकसभा निवडणुकीत (२०१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदाची खुर्ची जाणार, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवले आहे. मुंबईत एका खासगी वृत्तवाहीनिला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व राज्यांमधील विरोध पक्षांच्या सर्वसमावेशक आघाडीवरही पवारांनी या वेळी जोर दिला. तसेच, २०१९मध्ये सर्वपक्षीय आगाडीच्या निर्मितीमध्ये माझी भूमिका महत्त्वाची राहील असा दावाही पवारांनी केला.

२०१९मध्ये आपली भूमिका महत्त्वाची राहील. सर्वच राजकीय पक्षांसोबत माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षीयांन एकत्र आणण्यासाठी माझी भूमिका महत्तवाची राहील. सध्या मी भाजप विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. २०१९मध्ये भाजपला टक्कर द्यायची असेल तर, सर्वपक्षीय आघाडी महत्त्वाची आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष एकत्र यायला हवेत. महाराष्ट्रातही आघाडीची गरज आहे. भाजपने कधीही एकट्याने निवडणूक लढली नाही, असेही पवार म्हणाले. (हेही वाचा, ट्विटरची 'ब्ल्यू टीक' सांगा कोणाची? भाजपतील महाजन विरुद्ध मालवीय वाद मोदी, शाहांच्या कोर्टात)

दरम्यान, पवार यांनी राफेलच्या मुद्द्यावरही सूचक भाष्य केले. राफेल हे एक लडाऊ विमान आहे. देशाच्या लष्करी सामर्थ्याचा विचार करता राफेल विमान खरेदी महत्त्वाची आहे. मात्र, त्याच्या किमती आणि व्यवहारांबाबत जनतेच्या मनात शंका आहे. ही शंका दूर व्हायला हवी. पुढे भाजपवर निशाणा साधताना पवार म्हणाले, बोफोर्सवेळी भाजपने जेपीसीची मागणी केली होती. मात्र, राफेलच्या मुद्द्यावर हीच मागणी केली असता भाजप त्यापासून दूर पळत आहे.