बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी (Actress Shabana Azmi) यांच्या वाहनाला काल मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai- Pune Expressway) खालापूर (Khalapur) येथे अपघात झाला होता. यामध्ये शबाना यांच्या नाकाला व तोंडाला दुखापत झाली असून सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) उपचार सुरु आहेत. त्यांना कोणतीही अंतर्गत दुखापत नसल्याने लवकरच त्या यातुन बाहेर पडतील असे आज सलीम खान (Salim Khan) यांनी सांगितले होते. दरम्यान, रायगड पोलिसांकडून (Raigad Police) शबाना यांच्या कारच्या ड्रायव्हर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 279 (भरधाव वाहन चालवणे)आणि कलम 337 (एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य करणे) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजच्या दिवसाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा
रायगड पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची नोटीस चालकाला पाठवली आहे, मात्र शबाना यांची प्रकृती स्थिर असल्याने या प्रकरणात चालकाला अट्क होणार नाही असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ANI ट्विट
Police says that these are bailable offences so he need not be arrested but he has been issued a notice. https://t.co/qBfPoNoDDU
— ANI (@ANI) January 19, 2020
शबाना यांच्या अपघाताच्या वृत्तावर खेद व्यक्त करत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक खास ट्विट केले आहे. "ज्येष्ठ अभिनेत्री शबाना यांच्या अपघाताविषयी जाणून दुःख झाले, त्यांची प्रकृती लवकरच स्थिर होवो अशी आशा व्यक्त करणारे हे ट्विट आहे.
नरेंद्र मोदी ट्विट
The news of @AzmiShabana Ji’s injury in an accident is distressing. I pray for her quick recovery.
— Narendra Modi (@narendramodi) January 18, 2020
शबाना आझमी या आपल्या खासगी कारमधून मुंबई येथून पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. खालापूर टोलनाक्याजवळ आल्यावर त्यांच्या कारने रस्त्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला.