Close
Advertisement
 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024
ताज्या बातम्या
1 minute ago

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांचा बंद अखेर मागे; 19 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Chanda Mandavkar | Jan 19, 2020 11:38 PM IST
A+
A-
19 Jan, 23:38 (IST)

साईबाबा जन्मस्थळावरून सुरु झालेला वाद हा चिघळत चालला असून त्याचे रुपांतर आज सुरु झालेल्या बंदात झाले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर हा बंद अखेर मागे घेण्यात आला आहे. शिर्डी कृती समितीचे माजी विश्वस्त कैलास कोते यांनी याबाबतची घोषणा केली. आज रात्री 12 नंतर हा बंद मागे घेण्यात येईल. उद्या मुख्यमंत्र्यांसोबत होणा-या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्ही पुढील दिशा ठरवू असे सांगण्यात येत आहे.

19 Jan, 22:02 (IST)

उद्या म्हणजेच 20 जानेवारी रोजी दिल्लीच्या मुख्यालयात भाजप पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवारी प्रक्रिया होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्र्यांची तातडीची बैठक देखील बोलावण्यात आली आहे.

19 Jan, 19:10 (IST)

इन्स्टंट मॅसेजिंगसाठी सर्वाधिक प्रमाणावर वापरले जाणारे व्हॉट्सअॅप सध्या डाऊन आहे. जगभरातील युजर्सना याचा फटका बसत आहे. सायंकाळी 4 वाजल्यापासून व्हॉट्सअॅप डाऊन असल्याची माहिती मिळाली आहे.

19 Jan, 18:07 (IST)

शिर्डी बंद प्रकरणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ शिर्डीत दाखल झाले असून त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. जन्म स्थळावरून राजकारण न करता, बंद करुन वाद संपणार नाही असे भुजबळांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेऊन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

19 Jan, 17:23 (IST)

भारतीय जनता पार्टीच्या सर्व केंद्रीय मंत्र्याची उदया म्हणजेच 20 जानेवारील तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. दिल्लीतील पक्ष कार्यालयात ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

19 Jan, 16:29 (IST)

कोल्हापूर येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे शरद पवार यांच्या हस्ते लोकापर्ण सोहळा पार पडला आहे. गेल्या 50 वर्षांत कोल्हापूर असो किंवा अन्य कुठेही, शाहू महाराजांसंबंधी कुठलाही सोहळा असला तरी माझी उपस्थिती चुकलेली नाही असे ही शरद पवार यांनी म्हटले आहे.

19 Jan, 15:57 (IST)

दिल्ली येथे विधानसभा निवडणूकीच्या तिकीट वाटपावरुन भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले आहे.

19 Jan, 15:35 (IST)

हरिश्चंद्र गडावरुन रॅपलिंग करताना दरीत कोसळून प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी अनेकांकडून दु:ख व्यक्त करण्यात येत असून राष्ट्रवादी पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा ट्वीटच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Tweet:

19 Jan, 14:44 (IST)

कर्नाटक सरकार, कानाडी लोकांकडून मराठी भाषिकांवर अन्याय असल्याचे विधान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

19 Jan, 14:14 (IST)

गोपीनाथ मुंडे यांचे वरळी मधील कार्यालय येत्या 26 जानेवारी पासून सुरु होणार होते. मात्र आता हे कार्यालय 5 फेब्रुवारी पासून पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

Tweet:

Load More

आज मुंबईत सालाबादप्रमाणे गोल्ड लेबलचा दर्जा असलेल्या मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या मॅरेथॉनच्या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जयंत पाटील यांची उपस्थिती दिसून आली. यामध्ये तब्बल 55 हजार धावपटूंनी सहभाग घेतला असून पोलिसांसह कडेकोड बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच वाहतुकीच्या मार्गात मॅरेथॉन दरम्यान बदल करण्यात आला आहे.

पाथरीला साईबाबांचे जन्मस्थळ घोषित करण्याला तीव्र विरोध करत शिर्डीत आजपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. शिर्डीमध्ये पहिल्यांदाच बेमुदत संप पुकारण्यात आला असला तरीही साईबाबांचे मंदिर भक्तांसाठी दर्शन घेण्यासाठी सुरु राहणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या बेळगाव दौऱ्यावर गेले असून आज हुतात्मा चौकाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहे. तत्पूर्वी शनिवारी संजय राऊत यांच्या बेळगावातील दौऱ्यामुळे तणावाचे वातावरण दिसून आले होते. मात्र पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्यांनी नाथ पै व्याख्यानमालेचं उद्घाटन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली. गोगटे रंगमंदिरात राऊतांची ही मुलाखत झाली. मात्र आज संजय राऊत यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


Show Full Article Share Now