Sanitizer | Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash)

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. राज्यात केवळ अत्यावश्यक सेवानांच परवानगी देण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या वणी (Wani) येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. दरम्यान, दारूची तहान भागवण्यासाठी अनेकांनी चक्क सॅनिटायझर (Sanitizer) प्यायल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लॉकडाउन काळात दारुची दुकाने बंद आहेत. या काळात स्वतःवर नियंत्रण वणी शहरातील अनेकजण अपयशी ठरल्यामुळे त्यांनी अखेरीस सॅनिटायजर पिण्याचा निर्णय घेतला. या सर्वांनी काल सॅनिटायझर घेतल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना वणी येखील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हे देखील वाचा- Covid-19 Vaccination in Mumbai: मुंबई मधील कोणती लसीकरण केंद्रे आज सुरु आणि बंद? पहा BMC ची यादी

एएनआयचे ट्वीट- 

दत्ता लांजेवार, नूतन पथरकर, संतोष मेहर, गणेश नांदेकर, सुनील ढेंगले, गणेश शेलार आणि अन्य एकाचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाला आहे. हे सर्वजण वाणी शहरातील रहिवाशी आहेत. या सर्वांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

यापूर्वीही गेल्या वर्षी दारू मिळत नसल्याने अनेकांनी सॅनिटायझरचे प्राशन केल्याची माहिती समोर आली होती. ज्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. मात्र, असे असतानाही अनेकजण आपल्या जीवावर उधार होऊन दारूचे तहान भागवण्यासाठी टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत.