कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यातच लस, औषधं, आरोग्य सुविधा यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई (Mumbai) मधील लस साठा देखील मर्यादीत असल्याने काही लसीकरण केंद्र (Vaccination Centers) पूर्णपणे बंद झाली आहेत. काही अंशत: तर काही केंद्र पूर्णपणे सुरु आहेत. या लसीकरण केंद्रांची यादी बीएमसीने (BMC) ट्विटच्या माध्यमातून शेअर केली आहे. या यादीमुळे मुंबईतील नेमकं कोणतं केंद्र सुरु आणि कोणतं बंद आहे, याची माहिती नागरिकांना मिळेल आणि त्यांची गैरसोय टळेल.
मुंबईतील एकूण 132 लसीकरण केंद्रांची ही यादी आहे. यात वॉर्डनुसार लसीकरण केंद्रांची नावं दिली असून केंद्र खाजगी आहे की सरकारी हे देखील पुढे लिहिलं आहे. त्याचबरोबर ते केंद्र आज चालू आहे की नाही ते पुढच्या कॉलमध्ये तुम्हाला दिसेल. तुमच्या वॉर्डमधील केंद्रांची माहिती या यादीच्या मदतीने तुम्हाला अगदी सहज मिळेल. (COVID-19 Vaccination FAQs: लस निवडीचा पर्याय असतो का? ते स्मार्टफोन नसल्यास रजिस्ट्रेशन कसं करायचं? CoWIN Portal वर लसीच्या रजिस्ट्रेशन बाबत काही प्रश्नांची उत्तरं इथे घ्या जाणून)
BMC Tweet:
लसीचा पुरवठा मर्यादित असल्याकारणाने आज पूर्णपणे खुले/अंशतः खुले किंवा पूर्णपणे बंद राहणाऱ्या लसीकरण केंद्रांची ही यादी.#JabToBeatCorona pic.twitter.com/mE8lRKCSIj
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 24, 2021
1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरु होणार आहे. यासाठी 28 एप्रिलपासून रजिस्ट्रेशनला सुरुवात होईल. त्यामुळे लसींचा पुरेसा साठा राज्यांना होणे आवश्यक आहे. अन्यथा लस पुरवठ्याअभावी केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईतील हापकीन इंस्टीट्यूटला देखील लस निर्मितीची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे यापुढे राज्य सरकार याबाबत कोणती पाऊलं उचलतं, ते पाहणं देखील आवश्यक आहे.
कालच्या अपडेटनुसार, मुंबईत 7221 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसांत शहरातील एकूण 9541 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.