Satyajeet Tambe On Poonam Pandey: पूनम पांडे हिच्यावर कारवाई करा- आमदार सत्यजित तांबे
Satyajeet Tambe On Poonam Pandey | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) झाल्याने डेल-अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यांतून पुढे आले होते. दरम्यान, पूनम पांडे हिचा मृत्यू झालाच नाही. तिने केवळ कर्करोगाप्रती जनजागृती करण्यासाठी आणि लक्ष वेधण्यासाठी हा सगळा प्रपंच रचला होता, असा खुलासा तिने स्वत:च केला. त्यामुळे ती जीवंत असल्याची खात्री झाली. या सर्व प्रकारावरुन समाचातून तीव्र भावना व्यक्त होत असताना महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) हे देखील आक्रमक झाले आहेत. आपल्या निधनाबाबत खोटी आणि दिशाभूल माहिती प्रसारीत करुन सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याबाबत तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्या यावी, अशी मागणी तांबे यांनी केली आहे.

काय म्हणाले आमदार सत्यजीत तांबे

पूनम पांडे हिच्या निधनाबाबत तिच्याच मॅनेजरने मृत्यूबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती. टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे की, काहीही असले तरी कोवळ जनजागृती करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या बातम्या देणे, चुकीची माहिती पसरवणे, नागरिकांची दिशाभूल करणे योग्य नाही. पूनम पांडे हिने खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध केली किंवा प्रकाशित केली म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी, असे आमदार तांबे यांनी एका निवेदनात म्हटले आहे. (हेही वाचा, मृत्यूची खोटी बातमी पसरवणाऱ्या Poonam Pandey विरुद्ध Fir दाखल, मॅनेजरवरही कारवाई)

 पूनम पांडे नेहमीच वादात

अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेली असते. कधी तिने दिलेली ऑफर कधी तिने केलेले वक्तव्य अथवा फोटोशूट हे वादाचे कारण ठरत असते. या आधी तिच्यावर अनेक गुन्हेही दाखल झाले आहेत. दरम्यान, आता तिने जनजागृतीच्या नावाखाली प्रसिद्धीचा नावच फंडा अवलंबला आहे. वय वर्षे अवघे 32 असलेल्या पूनम पांडे हिने स्वत:च्याच निधनाचे वृत्त आपल्या मॅनेजरकरवी सोशल मीडियात व्हायरल केले. (हेही वाचा, Satyajeet Tambe यांचं नवं ट्वीट त्यांच्या कॉंग्रेस मध्ये पुनरागमनाच्या बाळासाहेब थोरातांच्या सूचक संकेतांना उत्तर?)

पूनम पांडे हिच्या निधनाचे वृत्त ऐकून तिच्या चाहत्यांसह सर्वांनाच धक्का बसला. प्रमुख धारेतील प्रसारमाध्यमांनीही काही काळ हे वृत्त दिले. त्यानंतर पुढच्या अवघ्या काहीच तासात ऑन कॅमेरा येत पूनम पांडे हिने आपण जीवंत असल्याचा खुलासा केला. तिच्या या कृतीमुळे तिच्या चाहत्यांसह सोशल मीडियावर एकच संताप व्यक्त केला जाऊ लागला. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे कृत्य करणे हे निंदनीय आहे. त्यामुळे कधी अशा लोकांचा खरोखरच मृत्यू झाला तरीदेखील लोक ती बाब गांभीर्याने घेणार नाहीत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. आता आमदार असलेल्या सत्यजित तांबे यांनीही पूनम पांडे हिच्या कृतीची दखल घेतल्याने खरोखरच तिच्यावर कायदेशीर कारवाई होणार का याबाबत उत्सुकता आहे.