Devendra Fadnavis | Twitter

नाशिक पदवीधर विधानपरिषदेच्या जागेवरून आमदार झालेले युवा नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा विधिमंडळात प्रवेश झाला आहे. कालपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये (Maharashtra Budget Session) त्यांनी हजेरी लावली आहे. सत्यजित तांबे अपक्ष आमदार आहेत. पण या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आवर्जून भेट घेतली आहे. या भेटी सत्रामुळे आता पुन्हा सत्यजित तांबेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा रंगला आहे.

सत्यजित तांबे यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भेट घेऊन त्यांना आजोबा स्व.स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांचे आत्मचरित्र त्यांना भेट दिल्याची माहिती दिली आहे.

पहा ट्वीट

दरम्यान सत्यजित तांबे हे मूळचे कॉंग्रेसचे होते पण विधानपरिषद निवडणूकीदरम्यान त्यांनी बंडखोरी केल्याचं सांगत निलंबन झालं आहे. निवडणूकीमध्ये भाजपानेही उमेदवार न देता अप्रत्यक्ष सत्यजित तांबे यांना मदत केली त्यामुळे ही जवळीक पाहता आता तांबे भाजपा मध्ये येणार का? अशी चर्चा रंगत आहे. दरम्यान तांबे मात्र यापूर्वीच आपण अपक्ष राहून काम करणार असल्याचं सांगितलं आहे.नक्की वाचा: Satyajeet Tambe यांचं नवं ट्वीट त्यांच्या कॉंग्रेस मध्ये पुनरागमनाच्या बाळासाहेब थोरातांच्या सूचक संकेतांना उत्तर? 

अर्थसंकल्पामध्ये जुन्या पेन्शनचा प्रश्न, तरूणांचा शिक्षण आणि बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागणी करणार असल्याचं मीडीयाशी बोलताना सत्यजित तांबे यांनी सांगितलं आहे. 9 मार्चला देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार आहेत.