Gunratna Sadavarte सातारा पोलिसांच्या ताब्यात; छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजीराजे यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल गुन्हा होता दाखल
Gunratna Sadavate | DD Sahyadri

शरद पवारांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' घराबाहेर झालेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाप्रकरणात अटक झालेल्या गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना आता सातारा पोलिसांनी (Satara Police) आपल्या ताब्यात घेतले आहे. दोन वर्षांपूर्वी मराठा आरक्षण प्रकरण्याच्या सुनावणी नंतर मीडीयाशी बोलताना त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते. समाहात तेढ निर्माण करणार्‍या त्यांच्या या वक्तव्याविरूद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंद झाला होता.

ऑक्टोबर 2020 मध्ये दाखल या सातार्‍यातील गुन्ह्याच्या चौकशीसाठी गुणरत्न सदावर्ते यांना बोलावण्यात आले होते. मात्र ते उपस्थित न राहिल्याने सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणात ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. पोलिसांची विनंती मान्य करत न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे दिला. आज सकाळी सदावर्तेंना सातारा पोलिसांनी ताब्यात घेऊन ते तेथे रवाना झाले आहेत. हे देखील नक्की वाचा: Gunaratna Sadavarte: शरद पवार निवासस्थान हल्ला प्रकरणाचे तीव्र पडसाद; गुणरत्न सदावर्ते यांची सात तास चौकशी, पोलीस दलातही कारवाईचा धडाका .

शरद पवारांच्या सिल्वर ओक या घरावरील एसटी कर्मचार्‍यांच्या हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच कोर्टाने 17 एप्रिलपर्यंत सदावर्ते यांचा ताबा घेण्याची सातारा पोलिसांना परवानगी देण्यात आली आहे.