महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: सातारा जिल्ह्यातील मतदारसंघ फलटण, मान, पाटण या जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून
Satara | (Photo Credits: File Image)

Maharashtra Assembly Elections 2019: राज्याच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणावर सातारा (Satara) जिल्ह्याचा मोठा प्रभाव पाहायला मिळत आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उप-पंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा पाया घातला. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा राहिला आहे. सातारा जिल्ह्यात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ येतात. कराड उत्तर ( Karad North) विधानसभा मतदारसंघ कराड दक्षिण (Karad South), कोरेगांव (Koregaon), पाटण ( Patan), फलटण (Phaltan) , माण (Man), वाई (Wai) , सातारा अशी या मतदारसंघाची नावे आहेत. या मतदारसंघांपैकी फलटण, सातारा, मान, पाटण या मतदारसंघातील राजकीय संघर्ष, प्रमुख लढती आणि विद्यमान स्थितीचा घेतलेला हा आढावा.

फलटण विधानसभा मतदारसंघ

राजकीयदृष्ट्य जवळपास सर्वच राजकीय पक्षांसाठी चुरशीची लढत असलेला असा हा फलटण विधानसभा मतदारसंघ. सध्यातरी या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिपक प्रल्हाद चव्हाण हे इथले विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दिगंबर आगवणे यांचा पराभव करुन ते निवडूण आले होते.

फलटण विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

दिपक प्रल्दाप चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – 92, 910

दिगंबर आगवणे, भारतीय राष्ट्रीय पक्ष – 59, 342

पोपटराव काकडे, स्वाभिमानी शेतकरी पक्ष – 24,529

नंदकुमार तासगावकर, शिवसेना – 31,032

सातारा विधानसभा मतदारसंघ

मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेला सातारा जिल्हा हा समाजिक आणि राजकीय अशा सर्वार्थाने महत्त्वाचा जिल्हा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना, भाजप यांच्यात जोरदार लढाई पाहायला मिळते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत इथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवेंद्रसिंह भोसले हे निवडूण आले होते. मात्र, आता शिवेंद्रसिंह भोसले हे राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देऊन सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे या वेळी इथे चुरशीची लढत होणार आहे.

सातारा विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

1. शिवेंद्रसिंह भोसले , राष्ट्रवादी – 97964

2. दिपक पवार, बीजेपी- 50151

3. हरिभाऊ सकपाळ- शिवसेना- 25421

4. रजनी पवार, काँग्रेस – 7187

माण विधानसभा मतदारसंघ

तालुक्याच्या शहराला तालुक्याचे नाव नसलेला असा एक दुर्मिळ योगायोग असलेला हा तलुका. म्हणजेच माण तालुक्याचे नाव परंतू, या तालुक्याचे सर्व प्रशासकीय व्यवहार मात्र दहिवडी या गावी चालतात. तालुक्याचे ठिकाण या अर्थाने दहिवडी शहरच महत्त्वाचे मानले जाते. अशा हटके तालुक्याचेच नाव इथल्या मतदारसंघाला देण्यात आले आहे. हे नाव म्हणजे मान तालुका विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात आतापर्यंत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची मोठी ताकद असल्यामुळे इथून या पक्षाचा उमेदवार 2014 मध्ये निवडूण आला.

मान विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

जयकुमार भगवानराव गोरे, भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – 75, 708

शेखर गोरे, राष्ट्रीय समाज पक्ष –52, 357

सदाशिवराव पोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – 35,562

रणजित देशमुख, शिवसेना – 31,032

अनिल देसाई, अपक्ष – 18,291

पाटण विधानसभा मतदारसंघ

कोयना धरण, सह्याद्री पर्वतरांगा, विजनिर्मीती प्रकल्प अशा अनेक कारणामुळे पाटण चर्चेत असते. राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचेही यांचे जन्मगाव पाटण तालुक्यात येते. माजी मुख्यमंत्र्यांचे गाव असल्याने इथे राजकीय संघर्ष पाहायला मिळतो.विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे शंभूराजे देसाई यांनी बाजी मारली.

पाटण विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

1. शंभूराज देसाई, शिवसेना – 1,04,419

2. सत्यजितसिंह पाटणकर,राष्ट्रवादी – 85,595

3. हिंदूराव पाटील,काँग्रेस- 7,642

4. दिपक महाडिक,बीजेपी- 2,102

5.सागर माने, अपक्ष- 2084

दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.