Satara Accident: मिनी बस नदीत कोसळून अपघात, 5 ठार, 7 जखमी; साताऱ्यातील उंब्रज जवळील घटना
Bus Crashes | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मिनी बस नदीत (Mini Bus Crashes Into Tarali River) कोसळून झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. ही घटना पुणे बंगळुरू महामार्गावर सातारा (Satara Accident) जिल्ह्यातील उंब्रज (Umbraj जवळ घडली. आज (14 नोव्हेंबर) पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये एक महिला आणि एका लहान मुलाचाही समावेश आहे. हे सर्व जण दिवाळीनिमित्त फिरायला निघाले होते. दरम्यान, तारळी नदीत (Tarali River) बस कोसळली आणि हा अपघात घडला.

प्राप्त माहिती अशी की, अपघात झालेल्या बसमधील सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. हे सर्व जण दिवाळीनिमित्त फिरायला गोव्याला निघाले होते. या वेळी पुणे बंगळुरू महामार्गावरुन जात असताना त्यांची बस सातारा जिल्ह्यातील उब्रज जवळ असलेल्या तराळी नदीत कोसळली. या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. तर, सात जण जखमी झाले आहेत. (हेही वाचा, Kondaibari Ghat Accident: कोंडाईबारी घाटात ट्रकच्या धडकेनंतर स्विफ्ट कार 35 फुट खोल दरीत कोळसली; 3 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी)

दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या सर्वांना सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसही नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात आणखी एक अपघात (Gondia Accident घडल्याचे वृत्त आहे. हा अपघात पोलीस वाहनाला घडल्याचे समजते.