Saptashrungi | PC: Twitter

नवरात्रीनंतर (Navratri) आता दिवाळी (Diwali) सणाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगड (Saptashrungi Gad) येथे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी (Saptashrungi Devi Temple) भाविकांची होणारी गर्दी पाहता हे मंदिर 24 तास भाविकांसाठी खुलं ठेवण्याचा निर्णय झाला आहे. आज 27 ऑक्टोबर पासून रविवार 13 नोव्हेंबर पर्यंत सप्तश्रृंगी मातेचं मंदिरं 24 तास खुलं राहणार आहे. यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.

दिवाळी सण, शाळा-कॉलेजला असलेल्या सुट्ट्या आणि यंदा 2 वर्षांनंतर साजरी होणारी निर्बंधमुक्त वातावरणामधली दिवाळी यामुळे भाविक मोठे संख्येने गडावर येतील असा अंदाज आहे. या काळात गडावर गर्दी होऊ नये यासाठी भाविकांना 24 तास दर्शनाची सोय आता खुली असणार आहेत.

मंदिर 24 तास खुलं ठेवले जाणार असल्याने भक्तनिवास, सुरक्षा व इतर बाबींदेखील सज्ज ठेवल्या जाणार आहेत. भगवती मंदिरातील पर्यवेक्षक, सेवेकरी, सुरक्षा रक्षक, मदतनीस तसेच देणगी कार्यालय येथील कर्मचारी आदीसह इतर यंत्रणा सज्ज ठेवल्या जाणार आहेत. फ्युनीकुलर रोप वे ट्रॉली सुविधा देखील भाविकांना या काळात सुरू राहील असे नियोजन करण्यात आले आहे.

सप्तश्रृंगीचं मंदिर हे नाशिक मध्ये स्थित आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ते एक आहे. भाविकांनी आता 24 तास दर्शन व्यवस्था सुरू राहणार असल्याने त्याचा फायदा घ्यावा. गर्दीच्या वेळेत दर्शन टाळून अन्य उपलब्ध वेळेचाही विचार करावा असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे.