महाराष्ट्रात सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं युद्ध सुरु आहे. यात सध्या महाविकासआघाडीचे (Mahavikasaghadi) सरकार सत्तेत आहे. हे सरकार बनविण्यात गेम चेंजर ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar). राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ऐतिहासिक मुलाखतीचा एक टीजर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. एक शरद, सगळे गारद…! असे या कार्यक्रमाचे नाव असणार आहे अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.
शरद पवारांची संजया राऊतांनी घेतलेली ही ऐतिहासिक मुलाखत 3 भागांमध्ये दाखविण्यात येणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग 11 जुलै रोजी शिवसेनेच्या मुखपत्रातून आणि डिजिटल माध्यमाद्वारे प्रसिद्ध केला जाणार आहे. तसंच त्यानंतर 12 आणि 13 जुलै रोजी या मुलाखतीचा दुसरा आणि तिसरा भागही पाहायला मिळणार आहे. विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच- सामना अग्रलेख
पाहा टिजर:
एक शरद!
सगळे गारद!! pic.twitter.com/SKcFH33o6v
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 8, 2020
कोरोनापासून सरकार स्थापनेपर्यंत, तसंच राममंदिराशी संबंधित प्रश्नांना शरद पवार हे उत्तर देत असल्याचं या टिझरमध्ये दिसत आहे. यापूर्वीही राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखती प्रचंड गाजल्या होत्या. त्याचप्रमाणे आता शरद पवारांची ही मुलाखत देखील ऐतिहासिक ठरेल याबाबत दुमत नाही. महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत पहिल्यांदा शरद पवारांशी ऑनस्क्रीन संवाद साधतील.