Sanjay Raut on Rave Party And Drugs: 'गुजरातला सोन्याने मढवा, सरकारच रेव पार्टीतून तयार झाले', संजय राऊत यांचा निशाणा
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

ड्रग्ज (Drugs) आणि रेव्ह पार्टीबद्दल (Rave Party) कसले प्रश्न विचारता. हे सरकारच रेव पार्टीतून तयार झाले आहे, असा घणाघात शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. राज्यातील राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाचार झाले आहेत. ते केंद्र सरकारचे मिंधे आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. राज्यातील उद्योग गुजातला आणि गुजरातमधील ड्रग्ज महाराष्ट्राला अशी स्थिती आहे. पंतप्रधान हे अवघ्या देशाचे असतात. कोणत्या एका राज्याचे नाही. पण, सध्याचे पंतप्रधान केवळ गुजरात राज्याचेच पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे ते देशभरातील इतर राज्यांतील उद्यग गुजरातला पळवत आहेत. इतकंच सगळं आहे तर एकदाच काय ते गुजरातला नेऊन मढवा, असे उद्गार शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केल आहे.

महाराष्ट्राला का ओरबडता?

मिंधे गटाने शिवसेनेचे नाव चोरले आहे. ते जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणि शिवसेना पक्षाचे नाव सांगत असतील तर त्यांनी राज्यातील उद्योग गुजरातला जात आहेत त्याबाबत बोलावे. पण, ते याबद्दल बोलणार नाहीत. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांसकट दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्राचे मिंधे आहेत, अशी तीव्र टीका राऊत यांनी केली आहे. (हेही वाचा, Sanjay Raut On Ram Temple and PM Narendra Modi: 'मोदी विष्णूचे तेरावे अवतार!', राम मंदिर मुद्द्यावरुन संजय राऊत यांची तीव्र टीका)

देशातील पहिला पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या ठिकाणी होणार होता. मात्र, तो आता गुजरातला हालवला जाणार आहे. यावरुन संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला आहे. नारायण राणे सांगतात ना.. मी 25 वर्षे शिवसेना पक्षात होतो. तर त्यांनी शिवसेनेतील बाणा दाखवावा. कोकणातील प्रकल्प गुजरातला गेला आहे त्याबद्दल बोलावे. उगाच लाचारी कशाला करता, असे आव्हानच राऊत यांनी दिले आहे. दरम्यान, गुजरातला सोन्याने मढवा पण महाराष्ट्राला का ओरबडता? असा सवाल राऊत यांनी पंतप्रधान आणि केंद्र सरकारला विचारला आहे. (हेही वाचा, Sanjay Raut vs BJP: पंतप्रधान मोदी आणि आदित्य ठाकरे यांचा ब्रांड एकच; संजय राऊतांनी दिलं BJP ला उत्तर)

'महाविकासआघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत'

दरम्यान, लोकसभा अथवा विधानसभा जागावाटपावरुन महाविकासआघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. महाराष्ट्रात कोणी काहीही बोलले तरी महाविकासआघाडीतील घटक पक्षांच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलूनच सर्व गोष्टी निश्चित केल्या जातील. अॅड. प्रकाश आंबेडकर आणि महाविकासआघाडी यांच्यांमध्येही समन्वय आहे. प्रत्येक जण जागांबाबत आग्रही आहे. पण, कोणालाही जागांचा आकडा लावता येणार नाही. आम्हाली नाही आणि मविआतील इतरही कोणाला नाही. शरद पवार यांचा राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट झाली. या भेटीत जागावाटपाबद्दल चर्चा झाली. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसोबतही चर्चा सुरु आहे. त्यामुळे आगामी काळात तुम्हाल चित्र स्पष्ट झालेले दिसेल, असेही राऊत म्हणाले.