Sanjay Raut | (Photo Credits: ANI/X)

शिवसेना (UBT) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राम मंदिर (Ram Mandir) आणि हिंदुत्व या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. बाबरी मशिद पडल्यावर जे पार्श्वभागाला पाय लावून पळाले त्यांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये. बाबरी पडली तेव्हा हे सर्व लोक काका वर करुन जबाबदारी टाळत होते. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी होय, बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे, असे उद्गार काढले होते. त्यामुळे या लोकांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये, असे राऊत यांनी म्हटले आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

''पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे आवतार''

भाजपवाल्यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू रामचंद्रांना बोटाला धरुन अयोध्येकडे घेऊन जाताना दाखवले आहे. हे प्रभू रामाला अयोध्येला घेऊन जाणार. म्हणजे हे स्वत:ला कोण समजतात? नरेंद्र मोदी म्हणजे विष्णूचे तेरावे अवतार काय? जे रामाला घेऊन अयोध्येला निघाले आहेत. हा भाजपाचा निर्लज्जपणा आहे. कोट्यवधी राम भक्तांच्या भावना दुखावणारं हे पोस्टर आहे, असे म्हणत राऊत यांनी निशाणा साधला आहे. (हेही वाचा, Sanjay Raut vs BJP: पंतप्रधान मोदी आणि आदित्य ठाकरे यांचा ब्रांड एकच; संजय राऊतांनी दिलं BJP ला उत्तर)

'बाळासाहेबांनी स्वीकारली जबाबदारी'

संजय राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, आम्ही सर्व जण प्रभू रामचंद्रांचे सामान्य भक्त आहोत. म्हणूच आम्ही या लढ्यात उतरलो होतो. अयोध्येसाठी लढाई सुरु असताना अनेक लोक ऐन वेळी काखा वर करुन बाजूला झाले. 'आम्ही ते केलेच नाही', असे म्हणून लागले. तेव्हाच स्पष्ट झाले होते की, हिंदुत्व मानणारे प्रभू रामचंद्रांचे व्हीआयपी आणि नकली भक्त कोण. पण हिंदुहृदयसम्राट बाळाळासाहेब ठाकरे एकमेव होते. ज्यांनी बाबरी पाडल्याची जबाबदारी स्वीकारली आणि जाहीरपणे सांगितले होय, बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे.

व्हिडिओ

बाबरीचे घुमट पडले तेव्हा कुठे गेले?

बाबरीचे घुमट पडले तेव्हा जबाबदारी स्वीकारताना कुठे गेल्या होत्या 56 इंच छात्या आणि मनगटं? तेव्हा यांच्या छात्या आणि मनगटं पीचली होती. आता हे बेगडी लोक आम्हाला हिंदुत्त्व शिकवत आहेत. अयोध्येला जाण्यासाठी आम्हाला निमंत्रणाची गरज नाही. आमची प्रभू रामचंद्रांवर निष्ठा आहे. आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ. यापूर्वीही जात आलो आहोत. त्यामुळे भाजपसारख्यालोकांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये. आम्हाला माहिती आहे आमचे हिंदुत्त्व काय आहे, अशा तीव्र शब्दांत संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.