राजकारणामध्ये प्रभू रामचंद्र यांचा केला जारा वापर, ईव्हीएम (EVM) आणि भाजप (BJP) प्रचार यावरुन शिवसेना (UBT) खासादर संजय (Sanjay Raut) राऊत यांनी थेट निशाणा साधला आहे. भाजपला थेट आव्हान देत राऊत यांनी म्हटले आहे की, हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर (Ballot Paper) निवडणुका घेऊन दाखवा. तुम्हाल प्रभू रामच काय 33 कोटी देवही वाचवायला येणार नाहीत. जगामध्ये कोठेही ईव्हीएम वापरले जात नाही. त्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वास उरला नाही. मात्र, जनतेचा विश्वास नसलेली यंत्रणा वापरुन तुम्ही निवडणुका लढत आहात, असा थेट हल्ला राऊत यांनी केला आहे. ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
'बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायाल भाजप घाबरतो'
संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत प्रसारमाध्यमांसमोर ठासून सांगिले की, आज रोजी ग्रामपंचायत, विधानसभा, लकसभा अशी देशातील कोणताही निवडणूक घेतली, आणि ती जर ईव्हीएमवर न होता बॅलेट पेपर द्वारे झाली, तर महाशक्ती असलेला भाजपा एकही निवडणूक जिंकू शकणार नाही. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य नव्हे तर ईव्हीएमद्वारे निवडूण आलेल्या हुकुमशाहीचे राज्य सुरु आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका भाजपला नको आहेत. अशा निवडणुकांना ते घाबरत आहेत, असेही राऊत म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut On MVA Seat Allocation: महाविकास आघाडी जागावाटप अंतिम टप्प्यात, जागावाटपामध्ये कुठलेही मतभेद नाहीत; संजय राऊत यांची माहिती)
नाशिक येथे शिवसेना (UBT) पक्षाचे एक राज्यस्तरीय अधिवेशन
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) पक्षाचे एक राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक (Nashik) येथे आयोजित करण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन पार पडणार आहे. या सभेसाठी शिवसैनिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ताकद लावली असून जय्यत तयारीस सुरुवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी मराठवाड्यामध्ये आढावा घेतला जात असल्याची माहितीही राऊत यांनी या वेळी दिली. (हेही वाचा, Sharad Pawar On BJP: शरद पवार यांचे भाजपच्या दाव्याला वस्तुनिष्ठ उत्तर, म्हाणाले 'कशाच्या जोरावर येणार 450 जागा')
महाविकासआघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकासआघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यासोबतची चर्चा अंतीम टप्प्यात आहे. भाजपला निवडणुकीत थेट भीडले जाईल. कोणालाही मागच्या दाराने निमंत्रण दिले जाणार नाही, ओठात एक आणि पोटात एक असे कोणीही करणार नाही. जे काही होईल ते सविस्तर चर्चा करुन आणि ध्येय ठरवूनच केले जाईल, असेही राऊत यांनी सांगितले.
दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत येत्या एक दोन दिवसांमध्ये आम्ही अंतिम चर्चा करु. या चर्चेत मसुदा ठरविण्यात येईल. देशामधील जवळपास 300 जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. तर 150 ते 175 जागांवर भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्ष अशी लढत आहे. इंडिया आघाडीसमोर लोकसभेच्या एकूण 543 जागांचे गणित स्पष्ट आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये देशात नक्की परिवर्तन दिसेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.