सांगली (Sangli Crime) जिल्ह्यातील जत (Jath Taluka) तालुक्यात दरीबडची (Daribadachi) येथे जावयाने (Son-in-law) सासऱ्याची (Father-in-law) हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सासरचे लोक बायकोला नांदायला पाठवत नाहीत, या रागातून चिडलेल्या जावयाने हे कृत्य केल्याचे समजते. जत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घडल्या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक राज्यातील अथणी येथील सचिन रुद्राप्पा बळोळी याच्याशी साधारण चार वर्षांपूर्वी जत तालुक्यातील दरीबडची येथील तेजश्री हिचा विाह झाला होता. लग्नानंतर सचिन आणि तेजश्री यांच्यात अवघ्या वर्षभरातच वाद सुरु झाला. त्यावरुन तेजश्री माहेरी गेली होती. बराच काळ ती माहेरीच होती. अनेकदा विनंत्या, सामोपचाराच्या बैठका होऊनही, तेजश्री नांदायला येत नव्हती. ती नांदायला आली तरी तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत सचिन हा तिला मारहाण करत होता, असे सासरच्या मंडळींचे म्हणने होते. (हेही वाचा, Crime: लग्नात अंगठी न मिळाल्याने सासऱ्याची हत्या, नंतर स्वत: केली आत्महत्या)
दरम्यान, जावई आणि मुलगी (तेजश्री) यांच्यात सुरु असलेला वाद मिटविण्याचा प्रयत्न सासरे म्हणून वडील आप्पासो यांनी केला होता. मात्र, इतके सगळे होऊनही जावई सचिन याचे चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीस मारहाण सुरुच होती. शिवगाळ करणे, त्रास देणे हे तर रोजचे होते. यातून तेजश्री या दरीबडची येथे माहेरी जाऊन राहिल्या. यावर पत्नीला नांदायला पाठवा म्हणून सचिन सातत्याने तगादा लावत होता. त्यात त्याने त्याने अथणी कोर्टात मुलगी नांदण्यास पाठवावी म्हणून केस केली आहे. दरम्यन, सासरच्या लोकांनी तेजश्रीला नांदायला पाठविण्यास नकार दिला. सचिन हा सातत्याने तसेच घटस्फोटासाठी न्यायालयातही अर्ज केला. हाच राग विकोपाला गेला. जावयाने सासऱ्याची हत्या केली.