Kishori Pednekar and Sandip Deshpande (Photo Credits: ANI/FB)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या ट्विटर अकाउंटवर यूजरला दिलेल्या वादग्रस्त रिप्लायमुळे हे प्रकरण आता चांगलच तापलय. त्यावर आता मनसेचे पदाधिकारी संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी देखील सडकून टिका केली आहे. ‘आलं अंगावर. ढकललं कार्यकर्त्यांवर. यापुढे माझा मोबाईल, माझी जबाबदारी, असं ट्वीट करुन संदिप देशपांडे यांनी पेडणेकरांना टोला लगावलाय. 'लसीचे कंत्राट कुणाला दिलं?' प्रश्नावर महापौरांच्या ट्विटर पेजवरुन 'तुझ्या बापाला' असं उत्तर देण्यात आलं. किशोरी पेडणेकरांच्या या उत्तरावर सोशल मिडियावर जोरदार टिका केली जातेय.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेली मुलाखत त्यांच्या अधिकृत अकाउंटवर ट्विट करण्यात आली होती. त्यावर यूजरने विचारलेल्या प्रश्नावर किशोरी पेडणेकर यांच्या ट्विटर पेजवरुन आक्षेपार्ह उत्तर आल्याने त्यावर जोरदार टिका केली जात आहे. यावर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिलेली प्रतिक्रिया

हेदेखील वाचा- नेटकर्‍याचा 'बाप' काढल्याने ट्वीटर वर चर्चेत आलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं स्पष्टीकरण

किशोरी पेडणेकर यांना आक्षेपार्ह ट्वीटबद्दल जाबही विचारला. त्यानंतर महापौरांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेले ट्वीट डिलीट केले, मात्र या ट्वीटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान आज अखेर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत या आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणावर पडदा टाकला आहे. ते ट्वीट एका शिवसैनिकांचा राग होता. ही भाषा योग्य नसल्याचं सांगत संबंधित व्यक्तीला समज देण्यात आली आहे तसेच प्रकार समजताच ट्वीट डिलीट केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.