Sambhajirao Kakade Passes Away: बारामतीतील शरद पवारांचे परंपरागत विरोधक संभाजीराव काकडे काळाच्या पडद्याआड; वृद्धपकाळाने निधन
Sharad Pawar (Photo Credit: PTI)

जनता पक्षाचे नेते आणि बारामतीमधील शरद पवारांचे परंपरागत विरोधक म्हणून ओळख असलेले माजी खासदार संभाजीराव काकडे (Sambhajirao Kakade) यांचे आज (10 मे) निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. संभाजीराव काकडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच एनसीपी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule)  यांनी ट्वीट करत आपली आदरांजली अर्पण केली आहे. संभाजीराव काकडे हे बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन वेळेस खासदार म्हणून दिल्लीला गेले आहेत. त्यापूर्वी त्यांनी आमदारकी देखील भूषवली होती.

सधन शेतकरी कुटुंबातील संभाजीरावांनी साखर कारखाना आणि सहकार क्षेत्रात भरीव काम केले आहे. पुण्यात आदिवासी समाजासाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. जनता पक्ष आणि समाजवादी चळवळीचे ते शिलेदार होते. मागील काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर होते.

शरद पवार यांचे ट्वीट

(नक्की वाचा: Sharad Pawar Letter: 'प्रिय सौ. बाई साष्टांग नमस्कार!' राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आपल्या आईस भावनिक पत्र).

संभाजीराव काकडे यांनी 1971 साली विधान परिषदेच्या माध्यामातून आमदारकी मिळवली होती. कॉंग्रेसच्या रंगराव पाटील यांच्यावर त्यांनी मात केली होती. पुढे 1978, 1982 साली ते लोकसभा निवडणूक बारामती मधून लढले आणि खासदार झाले. त्यांची महाराष्ट्रातील राजकारणावर मोठी छाप आहे. अनेक राजकारणी देखील त्यांनी घडवले आहेत.