दही हंडी (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईसह दहीहंडीचा खरा उत्साह पाहायला मिळतो तो ठाण्यात. ठाण्यात ठिकठिकाणी दहीहंडी (Dahi Handi) उभारल्यामुळे वाहतुकीत अडथळा येतो किंवा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे दही हंडीच्या उत्सवात रस्त्यावर बांधण्यात येणा-या दहीहंडीमुळे सामान्य नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून ठाण्यातील कासारवडवलीतील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चौकात पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था किंवा हे बदल फक्त24 ऑगस्ट पुरताच आहे.

या पर्यायी मार्गानुसार, महाराष्ट्र नगर ते निहारीका बिल्डिंग कडून, लोकपुरम चौक ते हॉस्पिटल चौकातून तुळशीधाम मार्गे, तत्वज्ञान सिग्नल किंवा हाईडपार्क मार्गे निश्चित स्थळी जाऊ शकता.

ठाणे शहर पोलिसांचे ट्विट:

तसेच पवार नगर बसस्थानकाकडून डॉ. काशिनाथ घाणेकर चौकाकडे जाणा-या सर्व वाहनांना अक्षय पात्र फाऊंडेशन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा- Dahi Handi 2019 Songs:गोविंदा आला रे, मच गया शोर... ते गोविंदा रे गोपाळा ही मराठी आणि बॉलिवूड गाणी दहीहंडी दिवशी तुम्हांला थिरकायला लावतील!

ठाणे पोलिसांनी सादर केलेल्या या मार्गावर गाड्या पार्क करण्यास सक्त मनाई आहे. दहीहंडीच्या पवित्र सणाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी ही वाहतूक सेवा ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनीही आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन ठाणे शहर पोलिसांनी केले आहे.