Dahi Handi Bollywood & Marathi Songs: बालगोपाळ कृष्ण (Lord Krishna) आणि त्याच्या करामती यावरील गोष्टी जर आपण ऐकल्या असतील तर कृष्ण आणि त्याचे खाण्यावरील प्रेम काही वेगळे सांगायला नको. लहानपणापासूनच दही, दूध ,लोणी अशा पदार्थांवर त्याचा भारी जीव होता. म्हणून मग कधी गवळणीच्या हंडीतलं दही चोरून तर कधी यशोदेकडे हट्ट करून कान्हा आपले आवडीचे पदार्थ खात असे इतकंच नव्हे तर आपल्या मित्रांनाही देत असे. गोकुळात त्याकाळी घरांमध्ये मडक्यात दही ठेवून ते दोरीने घराच्या छताला बांधले जायचे. एकदा हेच दही खाण्याची कृष्णाची इच्छा झाली. असता त्याने आपली टोळकी घेऊन गवळणींच्या घराकडे वाट धरली आणि मग आपल्या मित्रांना एक मनोरा रचायला सांगून त्यांच्या खांद्यावर चढून दह्याचा ताबा घेतला. बहुदा याच प्रसंगानंतर दहीहंडी या सणाची परंपरा सुरु झाली. यंदा देखील गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 ऑगस्ट ला देशभरात दहीहंडी (Dahi Handi) साजरी केली जाणार आहे.
हा सण रिअल आयुष्याप्रमाणेच सिनेमांमध्येही अनेकदा दाखवण्यात आला आहे.चला तर मग याच निमित्ताने मराठी आणि हिंदी मधील दहीहंडी विशेष काही जल्लोषपूर्ण गाण्यांवर नजर टाकुयात...Janmashtami 2019 Dresses for Boys: यंदाच्या गोकुळाष्टमीसाठी या सोप्या आणि सुंदर अशा आयडिजाच वापरुन लहान मुलांना करा खास वेशभूषेत तयार
गोविंदा रे गोपाळा
डॅशिंग गोविंदा
लाल पागोटं, गुलाबी शेला
मित्रा (कान्हा)
मच गया शोर
हर तरफ है ये शोर
चांदी की डाल पर सोने का मोर
तीन बत्ती वाला गोविंदा आला
अलीकडे अनेक मोठमोठी मंडळे दहीहंडी निमित्त स्पर्धांचे आयोजन करतात, यंदा देखील याच जल्लोषात दहीहंडी सोहळा पार पडणार आहे.