Janmashtami Dress Ideas For Boys: महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात गोकुळाष्टमी मोठ्या आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते. गोकुळाष्मी दिवशी मथुरेत कृष्णेचा सोहळा रंगला जातो, तर त्याच्या दुस-या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी सर्व गोविंदांचा उत्साह ही पाहायला मिळतो. यात तरुणाईचा उत्साह देखील अतिशय दांडगा असतो. इतकच नव्हे जर गोकुळाष्टमीसाठी छोट्या बाळगोपाळांचा देखील उत्साह पाहण्याजोगा असतो. या दिवशी अनेक शाळांमध्ये वेशभूषा स्पर्धा आयोजित केल्या जातात. तर काही शाळांमध्ये लहान मुलं-मुली राधा-कृष्णाचा वेश परिधान करुन दहीहंडी देखील फोडतात.
अशा वेळी लहान बाळगोपाळांना नटविण्यासाठी ब-याचदा आपण भाड्याने कपडे आणतो. हे कपडे कसे असले पाहिजे यासाठी वाचा या भन्नाट आयडियाज
1. सॅटिनचे पिवळे धोतर किंवा पांढरे धोतर:
पिवळ्या किंवा पांढ-या रंगाच्या धोतरावर जर एखादी सोनेरी रंगाची बोर्डर असेल तर ते खूप सुंदर आणि मनमोहक दिसेल. धोतर हे हिंदू धर्मात पुरुषांसाठी सर्व कपड्यांमध्ये पवित्र आणि श्रेष्ठ मानले जाते. जर तुमचा चिमुरडा हे धोतर परिधान करेल तेव्हा तो खूपच सुंदर आणि क्यूट दिसेल. त्यासोबत बासरी, मोर मुकुट आणि दागिनेही जरुर घाला.
2. पांढरे धोतर:
गोकुळाष्टमी साठी तुम्ही पांढ-या रंगाचे धोतरही लहान मुलांना घालू शकता. पांढ-या रंगाच्या कॉटनच्या धोतरमध्येही लहान मुलं खूप गोंडस दिसतं.
3. शिवलेला धोतर-कुर्ता सेट:
जर तुमच्या मुलाला केवळ धोतर घालणे पसंत नसेल तर तुम्ही त्याला शिवलेला धोतर-कुर्त्याचा सेट ही घालू शकता. हे तुम्हाला भाड्याने किंवा विकतही घेता येईल. यात तुम्हाला जास्त करुन पिवळ्या रंगाचा सेट मिळेल. मात्र त्यात मोरपिसांचा प्रिंटेड सेट, 'हरे राम, हरे कृष्णा' प्रिंट, साइड टाय-अप कुर्त्यांसारखे बरेच पर्याय उपलब्ध होतील.
4. मोर पंख मुकुट आणि बासरी:
श्रीकृष्णाच्या पोशाखासोबत बासरी, मोराचे मुकुट आणि दागिने सर्वात महत्त्वाचा हिस्सा आहे. या आभूषणांमुळे तुमच्या तान्हुल्याचे रुपडं अगदी खुलून जाईल. भगवान कृष्ण मुकुटामध्ये मोरपिस घालायचे, तसेच त्यांच्या हातात नेहमी बासरीही असायची.
हेही वाचा- Krishna Janmashtami 2019: भगवान श्रीकृष्णाच्या 'या' मंत्रांचा जप करा, दुर होतील आयुष्यातील समस्या
5. मोत्यांचे दागिने:
मोत्यांच्या दागिन्यांनी कृष्णाचा पेहराव पुर्ण होईल. कृष्णाची आतापर्यंत आपण जितकी रुप पाहिली त्यात मोत्यांचे दागिने आवर्जून पाहायला मिळाले. यात मोत्यांचा हार, बाजूबंद, कमरबंदजद, झुमके आणि हातातली कडी यांसारख्या आभूषणांनी तुम्ही तुमच्या मुलाला नटवू शकता.
6. मोगरा किंवा चमेलीच्या फुलांपासून बनवलेली माळ:
सुगंधित फुलांमध्ये मोगरा, चमेली, रजनीगंधा सारखी फुले कृष्णाला आवडायची. म्हणून तुम्ही या फुलांच्या माळा घालून लहान मुलांना नटवू शकता.
7. थोडासा मेकअप:
ब-याचदा कृष्ण बनवण्याच्या नादात आपण आपल्या मुलांचा चेहरा निळ्या रंगाने रंगवतो. असे करत असताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नाहीतर मुलांना या रंगाची एलर्जी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही साधा मेकअप देखील करु शकता. यात आपण काजळ, लिप बाम आणि लाल टिळा लावू शकता.
हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान कृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमी दिवशी झाला होता. लोक हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. कृष्णाप्रमाणे आपल्या लहान बाळगोपाळांच्या लिलया काही औरच असतात. म्हणून या दिवशी कृष्णाचा वेश या लहानग्यांना परिधान केला जातो.