Rohit Pawar बेळगाव मध्ये दाखल; राणी चन्नमा चौकातून फोटो पोस्ट करत सरकारला सवाल
Rohit Pawar | PC: Twitter

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मागील काही दिवसांपासून पेटला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडूनही या वादामध्ये काही संतापाजनक करण्यात आली आहे. अशामध्ये आज (13 डिसेंबर) महाराष्ट्रातील एनसीपी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) कर्नाटकातील बेळगाव मध्ये दाखल झाले आहेत. बेळगावात पोहचल्यानंतर त्यांनी तेथील राणी चन्नमा चौकात जाऊन फोटो शेअर केला आहे. सोबतच काही महत्त्वाच्या भेटीगाठी घेतल्या असल्याचे फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडीयात शेअर केले आहेत.

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍या काही लोकांच्या गाड्या अडवून दगडफेक झाल्याचे प्रकार समोर आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांनाही कर्नाटकात येऊ नका यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कारण देण्यात आले होते. दरम्यान या प्रश्नी शरद पवारांनीही अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे रोहित पवारांचं बेळगावात दाखल होणं अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे.

मीडीयाशी बोलताना रोहित पवारांनी, 'बेळगावात माझे अनेक नातेवाईक राहत असल्याने आमचे बेळगावशी नाते वेगळे आहे. मी आज बेळगावातील राणी चन्नमा चौकात जाऊन आलो पण सत्ताधाऱ्यांनी हे धाडस करून दाखवावे' असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

रोहित पवारांचा बेळगाव दौरा

बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेट देऊन शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला. सीमा लढ्यातील जेष्ठ नेतृत्व, महाराष्ट्र एकीकरण समितीचे मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांची देखील बेळगाव मध्ये निवासस्थानी रोहित पवारांनी भेट घेतली.