Aaditya Thackeray | (Photo Credits: Twitter)

कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प (Refinery Project) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नाणारवासियांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प रत्नागिरीतच इतर ठिकाणी हालविण्यात यावा अशी राज्य सरकारची इच्छा आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहील्याचीही चर्चा आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही याबाबत माहिती दिली. ते रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांसी संवाद साधत होते. राजापूर तालुक्यातील बारसू गावातील 13 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. याबाबत जानेवारी 2022 मध्ये पंतप्रधानांशी पत्रव्यवहार झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

आदित्य ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रिफायनरी प्रकल्प समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही गटांचे लोक आदित्य यांना भेटले. या वेळी राज्यात चांगले प्रकल्प यायला हवेत. परंतू जेव्हा हे प्रकल्प आणले जातील, येतील किंवा उभारले जातील तेव्हा सर्व स्थानिकांचे समाधान करुन आणि सर्वांना विश्वासात घेऊनच उभारले जातील, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. जसे आपण हा प्रकल्प नाणार येथून बाहेर आणला त्याच पद्धतीने आपण तो इतर ठिकाणी उभा करण्यासाठी प्रयत्नरत आहोत. त्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याकडे लक्ष दिले जाईल. त्यांना विश्वासात घेऊनच पुढचे पाऊल टाकले जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. (हेही वाचा, Pune: पर्यायी इंधनावरील भारतातील सर्वात मोठ्या कॉन्क्लेव्हचे पुण्यात होणार आयोजन, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती)

ट्विट

रिफायनरी प्रकल्पासाठी नाणार शिवाय इतरही अनेक जागा आहेत. प्रामुख्याने बारसू आणि तशाच प्रकारच्या इतरही जागा आहे. परंतू, स्थानिकांचा पाठिंबा असेल तरच असे प्रकल्प पुढे जातील. एखादा प्रकल्प आला तर त्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे हे राज्याचे काम असते. पण हे करत असताना भूमिपुत्रांशी संवाधही साधायला हवा. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र पठवले आहे. माज्ञ, त्याबाबत अद्याप उत्तर आले नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.