Sharad Pawar (File Photo)

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या पर्वाला भारतामध्ये सुरूवात झाली आहे. 30 मे च्या संध्याकाळी देशा-परदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रपती भवनाच्या पटांगणात भाजप प्रणीत एनडीएच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी या सोहळ्याला  अनुपस्थित  होते. शरद पवार हे नरेंद्र मोदी यांच्या गुरूस्थानी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र भाजप प्रणित एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्याला शरद पवारांना पाचव्या रांगेतील पास दिल्याने नाराज पवारांनी शपथविधी सोहळ्याला दांडी मारणं पसंत केलं. नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, अरविंद सावंत, संजय धोत्रे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि एका राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख असूनची शरद पवारांना पाचव्या रांगेचा पास दिल्याने हा शरद पवारांसोबत हा महाराष्ट्राचा अवमान झाल्याची भावना आहे. शरद पवार हे काल दिल्लीमध्ये दाखल झाले. शपथविधी सोहळ्यापूर्वी त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यानंतर ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणं अपेक्षित होते. मात्र त्यांना पाचव्या रांगेतला पास मिळाल्याने या सोहळ्याला जाणं त्यांनी टाळलं. शपथ विधी सोहळ्याला राष्ट्रपती कार्यालयाकडून पास दिले जातात. त्यामुळे शरद पवारांच्या बाबतीत नेमके काय घडलं? याची चर्चा आता रंगायला लागली आहे.

राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये काल नरेंद्र मोदीसह 58 खासदारांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यापैकी महाराष्ट्राला 8 मंत्रिपदं मिळाली.