राज्याच्या पोलीस महासंचालक (Director General of Police) रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना पदावरुन हटवण्यात आहे. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) ही कारवाई केली आहे. डीजीपी शुक्ला यांची कारकीर्द वादग्रस्त आणि आरोपांनी भारलेली राहिली आहे. खास करुन राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्याचा त्यांच्यावर मोठा आरोप आहे. त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असताना वादग्रस्त अधिकारी जर पदावर असेल तर ही प्रक्रिया निष्पक्षपणे पार पडेल का? याबाबत साशंकता आहे, असा आरोप करत काँग्रेसने शुक्ला यांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला होता. अखेर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
रश्मी शुक्ला यांची निवड घटनाबाह्य
रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर काँग्रेसने आनंद व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, ही कारवाई आगोदरच व्हायला पाहिजे होती. राज्यातील नेत्यांचे फोन टॅप करणारी व्यक्ती, जिच्यावर असंख्य आरोप आहेत, अशी व्यक्ती जर पोलीस महासंचालक पदावर बसत असेल, तर तो मोठा कट आहे. मुळात त्यांची या पदावर केलेली नेमणूक घटनाबाह्य होती. त्यांच्या माध्यमातून राज्य सरकार विरोधकांवर लक्ष ठेवले जात होते, असा आरोपही विजय वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. खरे म्हणजे त्यांचा सेवा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना सुट्टी दिली पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले. (हेही वाचा, Rashmi Shukla Hospitalised: राज्याच्या महासंचालक रश्मी शुक्ला रुग्णालयात दाखल, उपचार सुरु)
नवे पोलीस महासंचालक कोण?
प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे पोलीस महासंचालक पदासाठी नावे मागितली होती. सध्यास्थितीत सेवाज्येष्ठतेचा विचार करता संजय वर्मा यांचे नाव महासंचालक पदासाठी अधिक चर्चेत होते. मात्र, निवडणूक आयोगाने पॅनलद्वारे माहितल्याने एकापेक्षा अधिक नावे आयोगाकडे पाठविण्यात आली. त्यामुळे या चर्चेत संजय वर्मा आणि विवेक फणसाळकर यांची नावे सध्यास्थितीत चर्चेत होते आणि अखेर त्यांचेच नाव नि. (हेही वाचा, Rashmi Shukla Extension: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ)
अनिल देशमुख, नाना पटोले यांच्याकडून आनंद व्यक्त
रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवले ही अतिशय आनंदाची बाब आहे. राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असताना फोन टॅप करणारी व्यक्ती घटनाबाह्य पद्धतीने महासंचालक पदावर बसणे अतिशय धोकायादयक होते. त्यामुळे आयोगाने योग्य निर्णय घेतला आहे. पण तो घेण्यासाठी इतका वेळ का लावण्यात आला हा प्रश्न आमच्यादृष्टीने महत्त्वाचा असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आयोगाच्या कारवाईचे स्वागत केले आहे.