Mira road rape Case PC TWITTER

Mira Road Rape case: मुंबई जवळील मीरा भाईंदर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 45 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची माहिती उघडकीस आली आहे. ही घटना मीरा रोडच्या रामदेव पार्क परिसरात घडली आहे. या घटनेनंतर शहरातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपीला पकडून भाईंदर पूर्व येथील नवघर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. (हेही वाचा- दादरमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेला अटक; 6 महिलांची सुटका)

मिळालेल्या माहितीनुसार, एका मुस्लिम व्यक्तीने ४ वर्षाच्या हिंदू मुलीवर बलात्कार केला आहे. मोहम्मद दराज असं आरोपीचे नाव आहे. आरोपी चिकन शॉपचा मालक आहे. मीरा रोड येथे महाराष्ट्र चिकन शॉप आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. चिकनच्या दुकानाबाहेर संतप्त लोकांनी निषेध केला आहे. त्याला फाशी झाली पाहिजे अशी मागणी जमाव करत आहे. जमावाने त्याच्या दुकानाची तोडफोड केली आहे. दुकानाच्या बाहेर जमावानी संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संतप्त जमावाने आरोपीला ताब्यात घेऊन भाईंदर येथील नवघर पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तेथे पोलिसांनी आरोपीला अटक केले. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर (FIR) दाखल केला नाही. मात्र, जमावांनी प्रचंड विरोधानंतर पोलिसांनी अखेर मोहम्मद दराजविरुध्द एफआयआर दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.