केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) भाषणास उभे राहीले आहेत आणि त्यांनी कवीता म्हटली नाही असे होणे शक्यच नाही. आठवले यांचे भाषणविरहीत भाषण म्हणजे आता कल्पनाही केली जात नाही. कार्यक्रम स्थानिक असो अथवा संसदेच्या सभागृहातील भाषण. रामदास आठवलेंच्या कविता ठरलेल्याच. चिपी विमानतळ (Chipi Airport) उद्घाटन कार्यक्रमातही आज याचे दर्शन घडले. रामदास आठवले यांच्या भाषणादरम्यानच्या कवीता ऐकून उपस्थितांनाही हसू आवरले नाही.
आपल्या भाषणात बोलताना रामदास आठवले यांनी म्हटले की, सर्वच ठिकाणी राजकारण आणण्याची गरज नाही. राजकारण बाजूला ठेऊनही आपण एकत्र यायला हवे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मला आग्रह केल्याने आपण या कार्यक्रमाला आलो, असे आठवले यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला चांगला निसर्ग लाभला आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना रोजगाराच्या चांगल्या संधी नक्कीच निर्माण होतील. रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात काही कविताही केल्या. त्यातील काही कविता इथे देत आहोत. (हेही वाचा, Sindhudurg Chipi Airport Inauguration: खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी हकलून काढलं; नारायण राणे यांच्या समोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा टोला)
रामदास आठवले यांच्या कविता
''सिंधुदुर्गाच्या विकासाची उंचावणार कमान
कारण सिंधुदुर्गात आले आहे मुंबईवरुन विमान''
''एकत्र आले आहेत ठाकरे आणि राणे,
मला आठवले महायुतीचे गाणे''
''सिंधुदुर्गात आली आहे विकासाची आंधी
म्हणून मला इथे येण्याची मिळाली संधी''
दरम्यान, आठवले यांच्या कविता ऐकून उपस्थितांनीही दाद दिली. मंचावरील मंडळी आणि कार्यक्रमास जमलेले नागरिक यांच्यात आठवले यांच्या कविता ऐकुन हास्याची कारंजी फुलली. आठवले यांच्या कविता नेहमीच यमकप्रधान असतात. विशेष म्हणजे कोणत्याही क्षणी कविता करण्याची त्यांची विलक्षण हतोटी आहे.
व्हिडिओ
Video : याठिकाणी एकत्र आलेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे, मला आठवलेय महायुतीचे गाणे - आठवले@RamdasAthawale @MeNarayanRane @OfficeofUT #chipiairport #ramdasathawale #narayanrane #uddhavthackeray #shivsena pic.twitter.com/TqfeKs6EGm
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2021
चिपी विमानतळाचे आज उद्घाटन झाले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटणमंत्री आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामसादस आठवले उपस्थित होते. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिराधित्य सिंधिया हे ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमास उपस्थित होते. याशिवाय विविध प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षाचे नेतेही उपस्थित होते.