Photo Credit- X

Dadar Railway Station: मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या 5 मंदिरांना हटवण्याची नोटीस (Temple Demolition Notice) मध्य रेल्वेने (Central Railway) बजावली आहे. रेल्वेच्या सहाय्यक विभागिय अभियंता कार्यालयाकडून ही नोटीस बजावण्यात आली. 4 डिसेंबरला ही नोटीस जारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. यावरून आता राजकारण तापले आहे. या ५ मंदिरांमध्ये दोन महादेवाची मंदिरे, 1 महालक्ष्मी मंदिर, 1 दत्तात्रेय मंदिर आणि 1 हनुमान मंदिर यांचा समावेश आहे. संसदीय समितीने या अनधिकृत बांधकामांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत मंदिर बांधण्यात आले. ही अनधिकृत मंदिरे बांधल्याने प्रवाशांच्या आणि वाहनांच्या सुलभ वाहतुकीवर परिणाम होत आहे. रेल्वे विकासाच्या बांधकामात अडथळा निर्माण होत आहे. रेल्वे मंत्रालयाने दादर स्थानकाच्या विकासाचे काम इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला दिले आहे. (हेही वाचा:Mumbai: विक्रोळी येथे इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रेलरवरून मशिन पडल्याने दुचाकीस्वार जखमी; ड्रायव्हरला अटक (Watch Video))

नोटीस जारी केल्यानंतर सात दिवसात ही मंदिरे हटवण्यात यावी आणि जमिन रेल्वेला सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नोटीसीचे पालन न झाल्यास रेल्वे प्रशासनाद्वारे मंदिरांना हटवले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Water Cut in Mumbai City, Suburbs, Thane and Bhiwandi: 2 दिवस मुंबई शहर, उपनगरासह ठाणे आणि भिवंडीमध्ये 15 टक्के कपात; पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड)

दरम्यान, या नोटीसीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारांनी हस्तक्षेप करून विध्वंस थांबवावा, असे आवाहन देखील केले. 'ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेले मंदिर पाडण्याच्या फतव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतील ते मला पहायचे आहे.' असे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितले.