Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

Water Cut in Mumbai City, Suburbs, Thane and Bhiwandi: मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्रमांक 1 च्या बी फेज करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक बिघाड झाला. त्यामुळे केंद्रात एकूण कार्यरत 20 पंपांपैकी 6 उदंचन पंप बंद झाले आहेत. सहा पंपांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. 14 व 15 डिसेंबर रोजी हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगरांसह ठाणे आणि भिवंडी भागात पाणीपुरवठा 15 टक्के कमी करण्यात(Water Cut) आला आहे.

शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1 च्या सुमारास पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्रमांक 1 च्या बी फेड करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड झाला. पिसे उदंचन केंद्रात एकूण 20 उदंचन पंप आहेत. त्यापैकी सहा उदंचन पंप बंद पडले आहेत. हे वृत्त महापालिकेने त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केले आहे. बंद पडलेल्या सहा उदंचन पंपांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून 14 व 15 डिसेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने व जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.