राधाकृष्ण विखे-पाटील (फोटो सौजन्य-फेसबुक)

अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या (Pravara Cooperative Sugar Factory) अध्यक्षपदी (President) भाजप आमदार आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्रवरा येथे असलेला हा कारखाना आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी 1915 पासून अहमदनगरमधील प्रवरा परिसरात सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी सुरुवात केली होती. त्यांना सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवलं आहे. अहमदनगरच्या राजकारणात विखे कुटुंबिय नेहमीचं आघाडीवर राहिले आहे. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 17 जून 1950 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर (लोणी) येथे आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना सुरु झाला. त्यानंतर विखे कुटुंबाने 1964 मध्ये ‘प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. (हेही वाचा - तृप्ती देसाई यांची इंदोरीकर महाराजांना नोटीस; 10 दिवसांत उत्तर न दिल्यास न्यायालयात धाव घेणार)

सुरुवातीला काँग्रेसमध्ये असणारे राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेतेपद सोडून सत्ताधाऱ्यांमध्ये सहभागी झाले होते. 4 जून 2019 रोजी त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही महिने गृहनिर्माण मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला होता. या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा विजय झाला. सुजय विखे तब्बल 2 लाख 81 हजार 474 मतांनी जिंकली होते.