PMC Bank | Phot Credits: Twitter/ ANI

आरबीआय कडून पीएमसी बॅंकेवर निर्बंध घातल्याने अनेक खातेदारांचे लाखो रूपये बॅंकेमध्ये अडकून पडले आहेत. आज (30 ऑक्टोबर) दिवशी पुन्हा मुंबईमधील आझाद मैदानात पीएमसी खातेदारांनी एल्गार करत सरकार आणि आरबीआयविरुद्ध घोषणाबाजी करायला सुरूवात केली आहे. 'आरबीआय चोर है' अशा घोषणा देत संतप्त खातेदारांनी आपला रोष व्यक्त केला आहे. आर्थिक संकटात अडकलेल्या पीएमसी बॅंकेमधून खातेदारांना पैसे काढण्यावर निर्बंध घातल्याने अनेकजण आर्थिक विवंचनेमध्ये आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार यामुळे सुमारे 5 खातेदारांचा तणावाखाली येऊन मृत्यू झाला आहे. Fact Check: PMC बँक आणि SVC बँक एकत्र येणार? जाणून घ्या व्हायरल मॅसेज मागील सत्य.

आज सीएसटी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या आझाद मैदानात जमलेल्या खातेदारांनी महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर या पीएमसी बॅंक खातेदारांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली आहे. तर ही मागणी मान्य न झाल्यास सरकार आणि आरबीआयच्या भूमिकेविरूद्ध रास्तारोको आंदोलन करू, असा इशारा खातेदारांनी रिझर्व्ह बँकेला दिला आहे. आम्ही चोर नाही आणि निषेध नोंदवणे हा आमचा अधिकार असल्याचं सांगत आम्हांला आमच्या हक्काचे, कष्टाचे पैसे मिळायलाच हवेत असे खातेदारांचे मत आहे. RBI ची महाराष्ट्रातील अजून दोन बँकांवर मोठी कारवाई; ठोठावला 1 कोटीचा दंड

ANI Tweet

दरम्यान आज आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. गेट बंद केल्याने अनेक आंदोलकांनी यावर आक्षेप घेत आम्ही दहशतवादी नाही आम्ही आमच्या हक्काच्या पैशांसाठी भांडत आहोत असे म्हणत निषेध व्यक्त केला आहे. दिवाळीपूर्वी पीएमसी खातेदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी जाऊनही आंदोलन केले होते. त्यावेळेसही आक्रमक खातेदारांना पोलिसांनी रोखलं होतं.