PMC & SVC Bank Merger: पीएमसी बँकेच्या (PMC Bank) घोटाळ्यानंतर बँकेत पैसे अडकलेल्या खातेधारकांच्या आंदोलनांनी तीव्र स्वरूप धारण केले आहे. नव्याने गुंतवणूक करण्याची नागरिकांच्या मनात धास्ती बसली आहे. यापूर्वी सुद्धा काही बँकाच्या मर्जरमुळे अशीच स्थिती निर्माण झाली होती. अशातच आता पीएमसी बँक सुद्धा श्यामराव विठ्ठल सहकारी बँकेसोबत मर्ज होणार असल्याचे काही मॅसेज मागील काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. या मॅसेजमुळे SVC बँकेच्या खातेधारकांमध्ये गोंधळ पाहायला मिळत होता. या वर आता खुलासा करत स्वतः SVC बँकेतर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
व्हायरल मॅसेज
SVC बँकेच्या ट्विटवरून याबाबत माहिती देण्यात आली. "पीएमसी बँकेसोबत मर्जींग करण्याचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही, आम्ही आपल्या गुंतवणूकदारांचे, ठेवीदारांचे हिट जपून त्यानुसारच व्यवसाय करत आहोत. तरीही अशा प्रकारच्या फाव पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे हे ट्विट आहे.
पहा ट्विट
— SVC Bank (@SVC_Bank) October 20, 2019
दरम्यान, पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांना 4500 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराजाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सध्या सुरु आहे. साहजिकच या बँकेची व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे, हे कामकाज पुन्हा पूर्वस्थितीत आणण्यासाठी व नागरिकांच्या अडकलेल्या पैशांच्या सुटकेसाठी बँक मर्ज केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा सांगितले होते. मात्र हे मर्जर कोणत्या बँकेसोबत होणार याबाबत अद्याप कोणतेही वैध विधान समोर आलेले नाही.