Murder In Maharashtra | (Photo credit: archived, edited, representative image)

बारामती (Baramati) शहरातील प्रगतीनगर (Pragatinagar)परिसरात राहणाऱ्या संजीवनी बोभाटे (Sanjeevani Bobhate) या 34 वर्षीय मातेने ऋतुजा बोभाटे (Rutuja Bobhate) या आपल्या 19 वर्षाच्या मुलीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार मंगळवारी सकाळपासूनच घरात या माय-लेकींमध्ये वाद सुरु होते, या भांडणात मुलगी सतत उलट उत्तरे देत असल्याने वाद विकोपाला गेला आणि त्यामुळे संतापलेल्या आईने तिला मारायला सुरवात केली, याच रागात तिने घराबाहेरील एक दगड आणून मुलीच्या डोक्यात घातला आणि त्याचक्षणी मुलीने प्राण सोडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेनंतर संजीवनी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  सेक्स करण्यात अडथळा येत असल्याने आई-वडीलांनीच घेतला दीड महिन्याच्या बाळाचा जीव

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार ऋतुजाचे वेगळ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते मागील वर्षी कोणालाही काही न कळवता तिने या मुलासोबत लग्न केले होते. पण काहीच दिवस या मुलासोबत राहिल्याने त्यांच्यात देखील वाद होऊ लागले त्यामुळे चिडून ऋतुजा आपल्या आई वडिलांच्या घरी परतली होती. त्या मुलाचे घर सोडून आल्यावर तिने त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार देखील नोंदवली होती, मात्र 23 एप्रिल ला मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरच तिला तिचा पूर्व प्रियकर दिसल्याने न राहवून पुन्हा त्याच्याकडे जाण्यासाठी तिने घरी हट्ट करायला सुरवात केली.

खरतर हा मुलगा दुसऱ्या जातीचा असल्याने शिवाय त्याची आर्थिक परिस्थती देखील गरीब असल्याने ऋतुजाचे आईवडील त्यांचे लग्न स्वीकारायला तयार नव्हते मात्र तरीही मुलीच्या सुखासाठी त्यांनी या मुलाला पुन्हा संसार करण्यासाठी समजवायचा प्रयत्न केला होता. पण या मुलाने जोपर्यंत त्याच्या नवे केलेली बलात्काराची तक्रार मागे घेत नाही तोपर्यंत तिला पुन्हा घरात घ्यायला व स्वीकारायला नकार दिला होता. या सर्व प्रकारामुळे ऋतुजा आणि आई वडिलांमध्ये सतत वाद होत होते.

मंगळवारी सकाळी असाच वाद पुन्हा सुरु झाला आपले आई वडील आपला संसार नीट व्हावा यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीयेत असा आरोप करत ऋतुजाने आईसोबत भांडायला सुरवात केली. काही काळाने वाद इतका वाढला की संजीवनी यांचा आपल्या रागाचा संयम संपला आणि त्यांनी आपल्या पोटच्या मुलीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला, अशी माहिती बारामती पोलीस स्टेशनचे डीएसपी नारायण शिरगावकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

संपूर्ण घटनेनंतर संजीवनी बोभाटे यांच्याविरोधात बारामती पोलीस स्टेशन मध्ये टाकणार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी संजीवनी यांना अटक करून त्यांच्यावर आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.