
Pune Crime News: पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये म्हाडा वसाहतीमध्ये पोलीसांचा कोंबिग ऑपरेशन करत असताना काही इसमावर चोरी करण्याचा संशय आला. पोलीसानी सर्तक राहून त्यांच्यावर नजर ठेवले. रोझरी स्कूलच्या जवळ आठ ते दहा चोरटे ATM मधून पैसे चोरण्याचा प्रयत्न करत होते. मध्यरात्री एक च्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलीसांनी बड्या चालाकीने संशयित इसमांना ताब्यात घेतले आहे. ACP सुनील तांबे, PI बहिरट, PSI पवार आणि युनिट तीन कडील स्टाफ यांना पकडण्यासाठी जात असताना एका चोरट्याने पोलीसावर पिस्तूल रोखले. त्यानंतर आरोपींनी पोलीसांवर गोळीबार केला. पोलीसांनी आरोपींवर फायरींग केले. या प्रकरणात या झटापटीमध्ये एका आरोपीने PC कट्टे यांच्यावर हल्ला केला. त्यांना धारदार शस्त्र फेकून मारल्याने ते जागीच जखमी झाले.
पोलीसांनी फायरिंग सुरु केले असताना आरोपी अंधारातून टेकडीच्या दिशेने पळून गेले. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत होते. पोलीसांनी तात्काळ या घटनेची संपुर्ण माहिती पोलीस ठाण्यात दिली. वारजे माळवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या इतर आरोपीकडून एक गावठी कट्टा त्यामध्ये जिवंत काडतुसे, दोन लोखंडी कोयते, कटावणी स्क्रू ड्रायव्हर आणि हातोडा असे हत्त्यारे ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तपासा दरम्यान चोरटे SBI बॅंकेच्या ATMवर दरोडा टाकण्याचा तयारीत असल्याचे समोर आले आहे.