Delhi Double Murder: दिल्ली पुन्हा हादरली;आर्थिक वादामुळे दोन बहिणींवर गोळीबार,डबल मर्डरचा व्हिडिओ व्हायरल
दिल्लीत शनिवारी आरोपींने दोन सख्या बहिणींची गोळी झाडून हत्या केली. पोलीसांनी आरोपीला पडकले आहे. आणि या संदर्भात पोलीस आणखी तपास करत आहे.
Delhi Double Murder: देशाची राजधानी दिल्लीत एका अल्पवयीन मुलीचा खुन प्रकरणाने दिल्लीत खळबळ माजली होती. त्या संदर्भात रोज नवनवीन खुलासे होत होते. याचदरम्यान शनिवारी दिल्लीतील आरके पुरम भागात दोन सख्या बहिणींना गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या गुन्हेगारांने भररस्त्यात (Double Murder) दोन बहिणींवर गोळी झाडली. दिल्ली पोलीसांच्या दिलेल्या माहितीनुसार, पैश्यांच्या वादामुळे शनिवारी गुन्हेगारांने ह्यांच्यावर गोळी झाडली. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरु केला. गुन्हेगार पोलीसांच्या ताब्यात असल्याची माहिती (Delhi Police) दिल्ली पोलीसांकडून मिळाली आहे.
आंबेडकर बस्ती मध्ये हा प्रकार झाल्याचे सांगितले जात आहे. गोळीबार झाल्यानंतर पीडित महिलांना ताबडतोब सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालात उपचारा दरम्यान दोघींचा ही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पिंकी (30) ज्योती (29) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलीसांच्या तपसणी दरम्यान असे समोर आले की, पीडित महिलांच्या भावाचे आणि गुन्हेगार यांच्या दोघांमध्ये आर्थिक वाद सुरू होते तेव्हा भावाला वाचवण्यासाठी बहिणी पुढ्यात आल्या आणि दोन गुन्हेगारांनी महिलांवर गोळी झाडली. जखमी झालेल्या महिला जमिनीवर कोसळल्या, कालातंराने त्यांना रुग्नालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा - दिल्ली येथील आझाद मार्केटमध्ये इमारत कोसळली
दिल्ली पोलीसांनी या घटनेचा आढावा घेत गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. आरोपांवर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या घटनेचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2023 04:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

