Chakan-Shikrapur Road Accident: चाकण- शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात, आई-वडिलांसह 7 महिन्याच्या बाळाचा मृत्यू
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

चाकण शिक्रापूर रस्त्यावर (Chakan-Shikrapur Road) भीषण अपघात (Road Accident) घडला आहे. भरधाव कंटेनरने एका दुचाकी जोरदार धडक दिली असून या अपघातात आई-वडिलांसह त्यांच्या 7 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, 3 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. या संदर्भात माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच आरोपी कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अशोक दगडू पवार आणि त्यांची पत्नी सारिका अशोक पवार आणि त्यांच्या दोन मुली शुभ्रा आणि अनु यांच्यासोबत चाकण-शिक्रापूर रस्त्यावरून जात होते. दरम्यान, जातेगाव फाटा येथील न्यू पंजाबी ढाबा हॉटेलसमोर अशोक यांना फोन आला. ज्यामुळे त्यांनी आपली दुचाकी कडेला उभी करून फोन बोलू लागले. मात्र, त्याचवेळी पाठीमागून आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ज्यात अशोक, सारिका जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर उपचारदरम्यान सात महिन्याच्या अनुचाही मृत्यू झाला आहे. तर, शुभ्रा हिच्यावर अजूनही उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- Nagpur Crime: नागपूरमध्ये आईच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी 11 वर्षीय मुलीला कौमार्य विकण्याचे दिले आमिष, 3 आरोपी अटकेत

या अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तसेच आरोपी कंटेनरचालक बालाजी संजय येलगटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.