(Photo Credits : File Image)

पुणे (Pune) शहरात कॅम्प भागातुन पोलिसांंनी एका भुरट्या चोराला अटक केली आहे, आसिफ उर्फ भूराभाई अरिफ शेख असे या चोराचे नाव असुन तो मुळचा अहमदाबाद (Ahemdabad) चा रहिवासी आहे. खरतंंर अशा छोट्या मोठ्या चोर्‍यांंची माहिती ही पोलिसांपर्यंतच मर्यादित राहते मात्र या आसिफ च्या चोरीच्या चर्चा सध्या सगळ्या पुण्यात पसरल्या आहेत. याचंं कारण असं की, आसिफ हा चोरी करताना सुद्धा आपला नियम आवश्य पाळायचा, नियम म्हणजे काय तर हा चोर केवळ रिक्षाचालकांंचेच मोबाईल चोरत असे. विचित्र आहे, हो ना? पण आसिफ साठी ही फक्त चोरी नव्हती तर हा त्याचा सुड घेण्याचा मार्ग होता, पोलिसांंनी अटक केल्यावर चौकशी करताना त्याने आपले हे कारण बोलुन दाखवले आहे. काय आहे हा नेमका प्रकार जाणुन घ्या.

मुंबई: भरपावसात ट्रॅफिक मध्ये अडकलेले अभिनेते भारत गणेशपुरे यांचा मोबाईल लुटुन चोर फरार; फेसबुक वर शेअर केला अनुभव (Watch Video)

आसिफ हा अहमदाबाद चा रहिवाशी 2019 च्या जुन मध्ये आपल्या गर्लफ्रेंड सोबत लग्न करण्याच्या हेतुने तिच्यासोबत घरुन पळुन आला होता. बिजनेस आणि नवे वैवाहित जीवन सुरु करण्यासाठी आसिफ उत्साहात होता. मात्र त्याच्या गर्लफ्रेंडच्या डोक्यात मात्र भलताच प्लॅन होता, ज्यानुसार तिने पुण्याला येताच दोन दिवसांमध्येच आसिफ कडील पैसे व अन्य सामान घेऊन पळ काढला. ही तरुणी या सगळ्या सामानासह गुजरात ला गेली आणि तिने तिथे जाउन एका रिक्षाचालकाशी लग्न केलं. हा प्रकार कळताच आसिफ च्या रागाला पारावर उरला नाही आणि रिक्षाचालकाचा राग मनात धरुन त्याने कात्रज, कोंढवा, कॅम्प परिसरातील रिक्षाचालकांंचे मोबाईल चोरायला सुरुवात केली.

दरम्यान, 24 ऑगस्ट रोजी पोलिसांनी आसिफ ला अटक केली आणि दंंडाधिकारी न्यायालयाने 27 ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अटके नंंतर त्याच्याकडुन 12 मोबाइल जप्त करण्यात आले असून आतापर्यंत त्याने 70 हुन अधिक रिक्षाचालकांचे मोबाईल चोरल्याचे पोलिसांकडुन सांंगण्यात आले आहे.