Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

पुण्यातील (Pune) दौंड (Daund) तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वरवंड (Varwand) येथील गंगासागर पार्कमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून नंतर स्वतःचे जीवन संपवले आहे. या व्यक्तीने मागे सोडलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘पत्नीद्वारे होत असलेला कथित छळ’ हे त्याच्या कृत्याचे कारण असल्याचे नमूद केले आहे. डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय 42) आणि त्यांची पत्नी पल्लवी दिवेकर (वय 35) अशी या मृत जोडप्याची नावे आहेत. त्यांचे मृतदेह त्यांच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

त्यांच्या दोन मुलांची, अद्वैत अतुल दिवेकर (वय 11) आणि वेदांतिका अतुल दिवेकर (वय 7) यांचे नशीब त्याहूनही भयानक होते. त्यांना त्यांच्या राहत्या घराजवळ असलेल्या जगताप विहिर नावाच्या खोल विहिरीत ढकलण्यात आल्याची माहिती आहे. अंदाजे 45 फूट खोली असलेल्या या विहिरीतून मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत.

नागरिकांसह स्थानिक अधिकाऱ्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आहेत. उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सागर चव्हाण, दत्तात्रय टाकळे आणि हनुमंत भगत हे या दु:खद घटनेचा तपास करीत आहेत. (हेही वाचा: Mumbai Shocker: वादानंतर रागाच्या भरात 30 वर्षीय तरूणीची बॉयफ्रेंड कडून रिक्षात गळा चिरून हत्या; स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न अयशस्वी)

पेशाने पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या डॉ. अतुल दिवेकर यांनी मागे एक सुसाईड नोट सोडली असून, त्यात त्यांनी स्वत:चे जीवन संपवण्याचा विचार उघड केला आहे. आपल्या निरागस मुलांना जगताप विहिरीत ढकलण्याच्या अकल्पनीय कृत्याची कबुलीही त्यांनी यात दिली आहे. मयत पत्नी पल्लवी दिवेकर ही श्री गोपीनाथ माध्यमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून काम करत होती.