पुण्यात प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलानं दोन आयटी अभियंत्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं. या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन मिळाला. आरोपी अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पुण्यात उशिरापर्यंत सुरु असलेले बार आणि अमिर बापाच्या मुलाचा बेदरकारपणा आज दोघांच्या जिवावर बेतला. या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला पोर्शे गाडीतून बाहेर काढून चांगलाच चोप दिला होता. (हेही वाचा - Pune Crime: आलिशान पोर्शे कारने दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डर पुत्राचे पोलिसांकडून चोचले, आरोपीसाठी पिझ्झा बर्गरची खास सोय)
पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप हा सध्या होत आहे. वेदांत अग्रवाल हा अवघ्या 15 तासांमध्ये जामिनावर बाहेर आला. याबद्दल प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तांना फोन करुन आदेश दिले. या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशाही सूचना देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघाताला संबंधित कारचालक मुलाच्या वडीलांना कारणीभूत ठरवलंय. याप्रकरणी कारचालक मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याला दारु देणाऱ्या दोन पब चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई करण्यात आलीये.