Kirit Somaiya | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा पुणे महापालिकेच्या पायरीवर सत्कार करणे हे पुणे भाजप (BJP) शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. या प्रकरणात पुणे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपच्या जवळपास 300 कार्यकर्त्यांवर आज (रविवार, 13 फेब्रुवारी) पुणे पोलिसांकडून (Pune Police) गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमांचा भंग करत एकाच जागेवर अधिक मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवणे, महापालिका आवारातील वस्तुंचे नुकसान करणे आदी आरोप फिर्यादीत करण्यात आले आहेत.

पुणे महापालिकेत भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांकडून जोरदार हल्ला झाला होता. या वेळी झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. त्यानंतर जोरदार राजकारण सुरु झाले. महापालिकेच्या ज्या पायऱ्यांवर किरीट सोमय्या पडले. त्याच पायऱ्यांवर किरीट सोमय्या यांचा पुणे भाजपने सत्कार केला. या सत्कारासाठी पाच लोकांपेक्षा अधिक लोक जमले. त्यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या वेळी बेकायदेशीरपणे जमाव जमवने. महापालिका आवाराती वस्तुंचे नुकसान करणे यांसारखे आरोप फिर्यादीत करण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांचा सत्कार होत असताना भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कार्यकर्ते मोठ्या आवाजात घोषणाबाजी करत होते. (हेही वाचा, Kirit Somaiya Pushback Case: 'दोन, तीन महिने उठला नाही पाहिजे असा मार देण्याचा कट होता', किरीट सोमय्या यांचा दावा)

पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, भाजप नेते किरीट सोमय्या आणि पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह सुमारे 300 लोकांचा जमाव महापालिका प्रवेशद्वारावर आला होता. पोलिसांनी नेते आणि जमावाला सांगितले की, तुम्ही बेकायदेशीरपणे एकत्र आले आहात. त्यामुळे तुम्ही इथून निघून जा. वारंवार सांगूनही कार्यकर्ते घोषणाबाजी करत जमाव करुनच थांबले होते व काही वेळाने ते महापालिका आवाहात शिरले. या वेळी महापालिका आवारातील काही वस्तुंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे नारनवरे यांनी म्हटले.