पुणे: 67 वर्षीय व्यक्तीला पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराला आरोपाखाली अटक; POCSO Act अंतर्गत कारवाई
Say No to Sexual Assault. (Photo Credits: File Image)

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका 67 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पिंपरी परिसरात 6 डिसेंबर दिवशी या व्यक्ती विरोधात FIR नोंदवण्यात आली होती. आता पोलिसांनी ANI या वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार आरोपीला Indian Penal Code च्या Section 376 आणि POCSO Act अंतर्गत अटक करण्यात आली आहे. दरम्यान मागील काही दिवसात हैदराबादमध्ये डॉक्टर तरूणीवर बलात्कार आणि हत्या तसेच उन्नव मधील बलात्काराची घटना समोर आल्यानंतर भारतामध्ये महिला सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. Nirbhaya Case:'पोक्सोअंतर्गत दोषींना दया नकोच'- राष्ट्रपती रामनाथ कोविंद.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पिंपरी प्रमाणेच नागपूरमध्येही एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दिवसंदिवस लैंगिक अत्याचार, बलात्कार, हत्या याच्या घटना समोर येत असल्याने नागपूर, बीड पोलिसांनी महिलांना रात्री-अपरात्री घराबाहेर पडणं असुरक्षित वाटत असल्यास पोलिस मदत देण्यासाठी होम ड्रॉप सेवा आणि कवच कक्ष मोहिम हाती घेतली आहे.

ANI Tweet

उन्नाव बलात्कार प्रकरणात तरूणीचा काल (9 डिसेंबर ) मृत्यू झाला आहे. दरम्यान महिलांविरुद्ध वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता सरकार विरूद्ध रोष वाढत आहे.