Say No to Sexual Assault. (Photo Credits: File Image)

सध्या देशभरात हैदराबाद येथील डॉक्टर तरूणीच्या बलात्कार नंतर झालेल्या हत्येमुळे संतापाचे वातावरण असताना काल नागपूरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ केल्याप्रकारणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ANI च्या ट्वीटनुसार नागपूरमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव जवाहर बाबूराव वैद्य असं असून त्याला 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपा खाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान जवाहर वैद्य यांच्यावर Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act च्या अ‍ॅक्ट अंतर्गत केस रजिस्टर करण्यात आली आहे. Hyderbad Gangrape: डॉक्टर युवतीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणी संतापाची लाट; आरोपींना कायदेशीर मदत न देण्याचा वकिलांचा निर्णय.

ANI Tweet

नागपूर टुडे ने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर मधील परडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून स्थानिकांनी या चिमुकलीच्या मदतीसाठी होणारी आरडाओरड ऐकली. त्यानंतर जवाहरला पकडून देण्यास मदत केली. स्थानिकांच्या मदतीने जवाहरला पोलिस स्थानकामध्ये हजर करण्यास मदत झाली.