Pune Weather Update: पुणे येथे तिस‍‍‍‍र्‍या दिवशी पावसाचा जोर कायम; पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण (Watch Video)
Rain | Image used for representational purpose | (Photo Credits: @NarimanPatel/ Twitter)

मागील तीन दिवसांपासून पुणे (Pune) येथे अवकाळी पाऊस सुरु आहे. आज सकाळपासून मात्र काहीसे ऊन पडल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता मात्र दुपारी तीन च्या सुमारास पुन्हा एकदा ढग अंधारून आले आणि काहीच वेळात पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात झाली. याशिवाय पिंपरी- चिंचवड (Pimpari Chinchwad) या भागात सुद्धा सध्या ढगाळ वातावरण असून इथेही पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने या अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. पुण्यासहीतच कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई मध्ये सुद्धा पाऊस होईल असा अंदाज होता. एकूणच राज्यावर कोरोनारूपी ओढवलेल्या संकटात अवकाळी पावसामुळे आणखीन नुकसान होणार असेही दिसून येत आहे.

आज पुणे येथे दुपारी सुरु झालेला पाऊस सुरुवातीला हलक्या आणि रिमझिम स्वरूपात होता मात्र काहीच वेळात जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि सर्व रस्ते जलमय  झाले. यापूर्वी सुद्धा विजांच्या कडकडाटासह पुण्यात पाऊस झाला होता. हे देखील वाचा- कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबई आणि पुण्यात पुढील 5 दिवसांत पावसाचा अंदाज

पहा ट्विट

पिंपरी चिंचवड मध्ये ढगाळ वातावरण

(Photo Credits: File Image)

दरम्यान, पावसाळी वातावरणामुळे ताप सर्दी सारखे छोटे मोठे आजार पसरण्याची शक्यता असते, अगोदरच कोरोनामुळे पुण्याला बसलेला फटका पाहता आणखीन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहेत.