पिंपरी- चिंचवड (Pimpari - Chinchwad) येथील वाकड (Wakad) परिसरात रविवारी, 26 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडुन मग यातील सर्व रक्कम लंपास करण्याचा चोरांचा डाव होता. मात्र या प्रयत्नात असताना अचानक एटीएम मशीनचा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. यामुळे एटीएममधील तब्बल आठ लाख रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या. संबंधित एटीएमम हे अॅक्सिस बँकेचे (Axis Bank) आहे. ATM मधून पैसे निघाले नाहीत पण बँक खात्यातून रक्कम कमी झाल्यास प्रथम 'हे' काम करा
पोलिसांच्या माहितीनुसार, मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती या वाकड परिसरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होत्या. एटीएममध्ये प्रवेश करताच त्यांनी सीसीटीव्हीची दिशा बदलली असल्याने त्यांचे चेहरे कॅमेरा टिपू शकला नाही. एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न करत असताना अचानक भडका उडाला आणि एटीममध्ये आग लागली. आगीत एटीएममधील आठ लाख रुपये जळून खाक झाले आहेत आग मोठी असल्याने चोरांना सुद्धा इजा झाल्याची शक्यता आहे. फडणवीस सरकार कडून टॅप करण्यात आले विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन; अनिल देशमुख यांनी दिले चौकशीचे आदेश
दरम्यान, बँकेकडून या अज्ञात चोरांच्या वतीने वाकड पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तूर्तास त्यांचा तपास घेत आहेत.