प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Money Control.com)

जर तुम्ही ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यास त्यामधून तुमचा पिन क्रमांकाची सर्व प्रक्रिया करुन ही काही वेळेस पैसे निघत नाहीत. परंतु तुमच्या बँक खात्यातून तुम्ही एटीएम मधून काढण्यासाठी टाकलेले रक्कम कमी झाल्याचा प्रकार काही वेळेस होते.

अशा वेळी प्रथम घाबरुन जाऊ नका. तर प्रथम बँकेत याबद्दल तक्रार दाखल करा. तसेच ही तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागत नाहीत. मात्र बँकेकडून तुम्ही केलेल्या तक्राराची दखल घेतली आहे की नाही ते तुम्हाला मेसेजद्वारे समजून येते. त्यानंतर बँकेकडून दखल घेतल्यानंतर सात दिवसांच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात.(राजधानी, दुरांतो आणि शताब्दी एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी सुरु करण्यात येणार स्पेशल कोचेस, या कोचेसमधील असतील महिलांसाठी विशेष सोयी सुविधा)

मात्र बँकेकडून जर तुम्हाला 7 दिवसाच्या आतमध्ये पैसे पुन्हा न मिळाल्यास बँकेकडून तुम्हाला 100 रुपये अतिरिक्त शुल्क दिले जाते. तसेच ही रक्कम देताना बँकेला त्यामागील कारण स्पष्ट करणे अत्यावश्यक असल्याचे आरबीआय कडून सांगण्यात आले आहे.