Pune News: पुण्यातील वाकड येथे एका तरुणीने भावाच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाऊ आणि वहिणीकडून शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याने तरुणीने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली असून या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता रामेश्वर राठोड असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. (हेही वाचा- लातूर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार, मित्रच निघाला आईचा प्रियकर)
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीताचे काही वर्षापूर्वी लग्न झाले होते. तीचे पती रामेश्वर आणि दोन मुले राहायचे. रामेश्वर राठोड यांनी सुनीताच्या आत्महत्या प्रकरणी पोलिस ठाण्यात माहिती दिली. फिर्यादीनुसार सुनीताचा भाऊ संदीप शामराव चव्हाण आणि त्याच्या पत्नी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता यांनी भावाला दोन लाख रुपये उसने दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत संदीपने ते पैसे परत केले नाही. त्यानंतर ३ डिसेंबरला सुनीता पैसे मागण्यासाठी संदीपच्या घरी गेल्या. दरम्यान त्यांनी सुनीताला शिवीगाळ आणि मारहाण करून घरातून हाकलून दिले होते. या गोष्टीवरून त्या नैराश झाल्या. त्याच रात्री संदीपच्या पत्नीने सुनीला मारहाण आणि शिवीगाळ करण्यासाठी घरी पोहचल्या. त्यांच्या मोठं भांडण झाले. दुसऱ्या दिवशी कंटाळून सुनीताने पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली.
ही गोष्ट संदीप आणि त्यांच्या पत्नीला खटकली. दुसऱ्या दिवशी रस्त्यातच सुनीला दोघांनी बेदम मारहाण केली. याच गोष्टीला कंटाळून सुनीताने विष पियाली. १० डिसेंबर रोजी तीने टोकाचे पाऊल उचलले. तीला बेशुध्द अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला या प्रकरणी रामेश्वरने दोघांविरोधात तक्रार केली. दोघांवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.