Pune News: पुण्यातील आंबेगाव तालुक्यात शेततळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, निरगुडसर गावावर शोककळा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रय वळसे पाटील कृषी फार्मच्या शेततळ्यात तिन मुलींचा व एका मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खेळता खेळता ही मुले शेत तळ्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. श्रद्धा काळू नवले (वय 13), सायली काळू नवले (वय 11), दीपक दत्ता मध्ये(वय- 07), राधिका नितीन केदारी (वय -14) या चार विद्यार्थ्यांचा झाला शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनसाठी सर्व मृतदेह मंचर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेमुळे शेतमजूर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (हेही वाचा - Nashik, Solapur Dam News: इगतपुरी येथील भावली धरणात 5 जणांचा बुडून मृत्यू; उजनीमध्येही बोट उलटून 4 बेपत्ता)

ही मुले बुडत असल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांना शेततळ्याकडे धाव घेतली. पण तोपर्यंत त्यांचा बुडून मृत्यू झाला होता. भीमाशंकर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने चारही मुलांचे मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आले. ही मुले बुडत असल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांना शेततळ्याकडे धाव घेतली. शाळेला सुट्टी असल्यामुळे ही चारही मुलं शेततळ्या शेजारी खेळत होती. त्यानंतर ही मुले पाण्यात उतरली होती.

चार विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईवडिल आणि नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला. या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथे राहणाऱ्या उज्ज्वल गिरी हा तरुण आपल्या मित्रासोबत राधानगरी तालुक्यात पर्यटनांसाठी आला होता. आज दुपारी तो काळम्मावाडी येथे आला असता काळम्मावाडी धरणाजवळील पाण्यात पाय घसरून पङला.