पुणे: पाऊस नाही गावात, पुराचं पाणी घुसलंय घरात; इंदापूर तालुक्यातील अनेक गावांची स्थिती
Flood Situation At Nira Narasingpur (File Photo)

Maharashtra Monsoon 2019: इंदापूर (Indapur) तालुक्यातील ग्रामस्थ सध्या गावात न पडलेल्या पावसाच्या पुराचा तडाखा सोसत आहेत. राज्यभरात अनेक ठिकाणी संततधार कोसळलेल्या पावसामुळे अनेक शहरं, गावं आणि वाड्या वस्ताय महापूर, पूरसदृश्य स्थितीचा सामना करत आहेत. पण, पुणे (Pune) जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याती काही गावं अशी आहेत की, या गावात अद्यापही म्हणावा तसा पाऊस पडला नाही. पण, भीमा आणि नीरा नदी दुथडी भरुन वाहात आहेत. या नद्यांना आलेल्या पुराचे पाणी या गवांमध्ये शिरले आहे. त्यामुळे या तालुक्यातील अनेक गावांचा संपर्कच तुटला आहे. तिर्थक्षेत्र नीरा नरसिंगपूर (Nira Narasingpur) हे त्यापैकीच एक.

प्राप्त माहितीनुसार, तीर्थक्षेत्रज्ञ नीरा नरसिंहपूर जवळपास अर्धे पाण्याखाली गेले आहे. या गावाच्या चाहरी बाजूंनी पाणीच पाणी आहे. जसे की गावाला पाण्याचा वेढा पडला आहे. या गावाचा संपर्क प्रामुख्याने पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांशी येतो. या दोन्ही जिल्ह्यांशी या गावाचा संपर्क तुटला आहे. उजनी पात्रात 1 लाख 60 हजार क्युसेक्स इतक्या प्रमाण पाण्याचा विसर्ग होत आहे. तर, उजनीतून भीमा नदीत करण्यात येत असलेल्या पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण तब्बल 1 लाख 70 हजार क्यूसेक इतके आहे. त्याचप्रमाणे नीरा नदीमध्ये वीर धरणातून येत असलेल्या पाण्याचे प्रमाण हे साधारण 90 हजार क्यूसेक इतके आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरुन वाहात आहे. पण, आता या नदीच्या पाण्याने पूराचे रुप धारण केले आहे. या पुरचा फटका नीरा व भीमा नदीच्या संगमावर वसलेल्या तिर्थक्षेत्र नरसिंगपूर गावाला बसला आहे. या गावाचा इतर गांवाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

नरसिंगपूर हे पुणे जिल्ह्यात इसलेल्या इंदापूर तालुक्यातील एक प्रसिद्ध तिर्थक्षेत्र आहे. या तिर्थक्षेत्राच्या एका बाजूला नीरा नदी तर दुसऱ्या बाजूला भीमा नदी आहे. या तिर्थक्षेत्राच्या तिसऱ्या बाजूला दोन्ही नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या तिर्थक्षेत्राचे एकूण भौगोलीक स्थान विचारात घेताल तिन्ही बाजंनी पाणी तर केवळ एकाच बाजूने जमीन आहे. या क्षेत्राचा आकार सिंहाच्या नाखासारखा असल्याचे सांगितले जाते. (हेही वाचा, Maharashtra Monsoon 2019: पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची बैठक; आरोग्य यंत्रणेला सर्तक राहण्याचे आदेश)

दरम्यान, नैसर्गीकआपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, एनडीआरएफ दलाचे जवान या ठिकाणी सज्ज आहेत. काही ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या आधी 2005-2006 मध्येही या ठिकाणी पूरजन्य स्थिती उद्भवली होती.